जालना : महामार्गालगतच्या शेतात गांजाची झाडे; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

जालना : महामार्गालगतच्या शेतात गांजाची झाडे; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा महामार्गालगतच्या शेतात गांजाची झाडे लावल्‍याचा प्रकार समोर आला. वडीगोद्री परिसरातील धुळे-सोलापूर महामार्ग-52 लगत असलेल्या शेतात पोलिसांनी 33.10 किलोची गांजाची झाडे जप्त केली. ही कारवाई दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजता करण्यात आली. यात 3 लाख 30 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एकाविरूध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, गोंदी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वडीगोद्री जवळ धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या शेतात गांजाची झाडे लावण्यात आली होती. यानुसार गोंदी पोलिसांनी शेतात छापा टाकून गांजाची 22 झाडे जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले. गांजा मोजला असता, त्‍याचे 33 किलो ग्रॅम इतक वजन भरले. संशयीत आरोपीने बटाईने केलेल्या शेतात गांजाची झाडे लावली होती. या प्रकरणी शनिवारी रात्री उशीरा सहायक पोलीस निरीक्षक दिपक लंके यांच्या फिर्यादी वरून रामधन अमृत पवार (वय 50) रा.सौन्दलगाव शिवार ता. अंबड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि कारवाई गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, नायब तहसीलदार धनश्री भालचिम, सहायक पोलीस निरीक्षक दिपक लंके, जमादार कल्याण आटोळे, गोपनीय शाखेचे महेश तोटे, पंचमीरे, गजानन अवचार, विलास वाघमारे, शहादेव कणसे, अविनाश पगारे, अशोक नागरगोजे, अशोक कावळे, मदन गायकवाड कृषी सहायक गोवर्धन उंडे आदी होते.

हेही वाचा : 

Back to top button