जम्मू-काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

जम्मू-काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 21 व्या शतकातील हे दशक जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे दशक आहे. मला आनंद आहे की जम्मू आणि काश्मीरमधील तरुण त्यांच्या राज्याच्या विकासासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जम्मू आणि काश्मीर रोजगार मेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी :  जम्मू आणि काश्मीरला नवीन उंचीवर घेऊन जायचे आहे

जम्मू आणि काश्मीर रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज जम्मू आणि काश्मीरमधील विविध सरकारी विभागांमध्ये काम करण्यासाठी 3,000 तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिली जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या जनतेने नेहमीच पारदर्शकतेवर भर दिला आहे. जे तरुण आज सरकारी सेवेत सामील होत आहेत त्यांनी पारदर्शकतेला आपले प्राधान्य दिले पाहिजे. जम्मू-काश्मीर हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. एकत्रितपणे आपल्याला जम्मू आणि काश्मीरला नवीन उंचीवर घेऊन जायचे आहे.

गेल्या 8 वर्षांत सरकारने रोजगाराच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. रोजगार मेळावा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, केंद्र सरकारकडून येत्या काही महिन्यांत 10 लाखांहून अधिक नियुक्ती पत्र दिली जाणार आहेत.

पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, मला सांगण्यात आले आहे की 2019 पासून आतापर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये जवळपास 30,000 सरकारी पदे भरण्यात आली आहेत, त्यापैकी गेल्या 1-1.5 वर्षांत जवळपास 20,000 नोकर्‍या देण्यात आल्या आहेत. असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button