Juhi Chawala's Twit : दक्षिण मुंबईतील हवेतील दुर्गंधीवर जुही चावलाची तक्रार, वाचा काय म्हणाली? | पुढारी

Juhi Chawala's Twit : दक्षिण मुंबईतील हवेतील दुर्गंधीवर जुही चावलाची तक्रार, वाचा काय म्हणाली?

पुढारी ऑनलाइन डेस्क : Juhi Chawala’s Twit : दक्षिण मुंबईतील हवेतील दुर्गंधीवर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री जुही चावलाने तक्रार केली आहे. तिने ट्विटरवरून ही तक्रार केली आहे. अभिनेत्री जुही चावलाने म्हटले आहे संपूर्ण दक्षिण मुंबईतील हवेला दुर्गंधीने व्यापून टाकले आहे.

Juhi Chawala’s Twit : जुहीने ट्विट केले आहे की, ”कुणाच्या लक्षात आले आहे का… मुंबईत हवेत दुर्गंधी आहे…? पूर्वी खड्ड्यांवरून तसेच (वरळी आणि वांद्रे जवळील जवळजवळ अस्वच्छ प्रदूषित जलकुंभ, मिठी नदी जवळून जाताना याचा वास येत होता. मात्र आता संपूर्ण दक्षिण मुंबईत वास जाणवत आहे… ती एक विचित्र रासायनिक प्रदूषित हवा आहे. जी रात्रंदिवस जणू आपण गटारात राहत आहोत.”

Juhi Chawala’s Twit : जुही चावलाने हे ट्विट शेअर केल्यानंतर तिच्या या ट्विटवर तिच्या अनेक चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी फक्त दक्षिण मुंबईच नव्हे तर संपूर्ण मुंबईतच ही परिस्थिती आहे, असे म्हटले आहे.

Juhi Chawala’s Twit : जुहीच्या एका चाहत्याने लिहिले आहे, मुलुंड पूर्वेकडे पहाटे गाडी चालवा…दुर्गंधी वाढेल. दुस-याने शेरा मारला, विक्रोळी मुलुंड. भांडुप परिसर तपासा. संपूर्ण मुंबईचा कचरा तिथं टाकला गेल्याने हे सर्वात वाईट आहे. एका लेखकाने म्हटले, ”मला वाटते की तुम्ही ज्या समस्येचा उल्लेख करत आहात ती पाण्याशी संबंधित आहे आणि कदाचित प्रक्रिया न केलेल्या सीवरेजचा काही प्रवाह आहे. तर एका ठाणेकराने प्रतिक्रियेत लिहिले आहे. केवळ सोबोमध्ये तर वरच्या ठाण्यापर्यंतही त्याचा वास येऊ शकतो.

जुही चावलाच्या या ट्विट वर एका चाहत्याने चिडून लिहिले आहे ‘हबीबी दिल्लीला ये’ असे म्हणत राजधानी दिल्लीची छायाचित्रे पोस्ट केली.
जुहीने ग्रीन इश्यूजबद्दल सार्वजनिकपणे चिंता व्यक्त केली. तसेच मोबाइल टॉवरमधून अतिरिक्त बाहेर पडणा-या रेडिएशनवर दावा दाखल केला.

Juhi Chawala’s Twit: जुहीने जरी ही तक्रार केली असली तरी ते ट्विटरवरून केले आहे. हे फक्त एक ट्विट आहे. जुही चावलाने कोठेही अधिकृत लेखी तक्रार दिलेली नाही. तसेच तिच्या या ट्विटला कोणत्याही अधिका-याने रिप्लाय दिलेला नाही.

हे ही वाचा :

Elon Musk: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा ट्विटरवर आता कॉमेडी होणार कायदेशीर

पिंपरी : साडेपाच लाखांची गुजरात बर्फी जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Back to top button