Dasara Melava : महिला सशक्तीकरणाची गरज – सरसंघचालक मोहन भागवत | पुढारी

Dasara Melava : महिला सशक्तीकरणाची गरज - सरसंघचालक मोहन भागवत

पुढारी ऑनलाइन डेस्क : Dasara Melava समाजात आज महिला सशक्तिकरणाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. सार्वजनिक कार्यांमध्ये महिलांचा बरोबरीने सहभाग असायला हवा. त्याशिवाय प्रगती शक्य नाही. समाजाला संघटित करायचे असेल तर महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिलांशिवाय संघटन शक्ति पूर्ण होणार नाही. आपल्याकडे आपण स्त्रीला जगतजननी म्हणतो मात्र आज मातृशक्तीला सशक्त करण्याची गरज आहे, असे मत आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

Dasara Melava विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूर येथे दरवर्षी संघाचा मेळावा आयोजित केला जातो. यावर्षी रश्मी बाग मैदानात आयोजित दसरा मेळावा मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सुरू आहे. या मेळाव्याचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महिलेला प्रथमच स्थान देण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा मेळावा सुरू आहे. मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आदि मान्यवर उपस्थित आहेत.

Dasara Melava यावेळी महिला सशक्तीकरणा विषयी बोलताना मोहन भागवत म्हणाले संघाच्या कार्यक्रमात यापूर्वीही स्त्रियांचा सहभाग होता. आपल्या संस्कृतीत महिलांचा पूर्वीपासून आदर आणि सन्मान करण्याची परंपरा आहे. संस्कृतीत पूर्वीपासून प्रत्येक कार्यक्रमात महिलांना मानाचे स्थान देण्याची पद्धत आपल्याकडे होती. मात्र नंतरच्या काळात सातत्याने होत असलेल्या विदेशी आक्रमणामुळे स्त्री सुरक्षेच्या नावाखाली त्यांना घरातच राहण्याचे बंधन लादण्यात आले. मात्र आजच्या काळात महिलांना घरात डांबून ठेवणे योग्य नाही.

आम्ही स्त्री श्रेष्ठ की पुरुष श्रेष्ठ हा वाद मानत नाही. आमच्याकडे दोघेही श्रेष्ठ आहेत. आमची संस्कृती हे मानते की दोघेही एकमेकांना पूरक आहे. महिलांशिवाय समाजाचे संघटन शक्य नाही, असे यावेळी भागवत यांनी म्हटले आहे.

Dasara Melava या व्यतिरिक्त भागवत यांनी श्रीलंकेला सहाय्य, युक्रेनच्या जमिनीवर रशिया आणि अमेरिकेच्या युद्धात आपण जी भूमिका जागतिक मंचावर मांडली त्यामुळे जगात आपले वजन वाढत आहे. आपला देश अधिक स्वावलंबी बनत आहे. समान कल्पना आणि मार्ग काढण्यासाठी लवचिकता असणे आवश्यक आहे. परस्पर समजदारी महत्वाची आहे. किती लवचिकता असावी आणि किती नसावी याची समजदारी येणे महत्वाचे आहे, असे अन्य मुद्देही भागवत यांनी आपल्या भाषणात मांडले..

हे ही वाचा :

Dasara Melava 2022 : शिंदे-ठाकरे आज आमने-सामने, मुंबईत प्रथमच दोन मैदानांवर दोन सेनांचे दोन दसरा मेळावे

दसरा मेळाव्यासाठी शिंदे सरकारने बसेससाठी 10 कोटींचा खर्च केल्याचा काँग्रेसचा आरोप, केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशीची मागणी

Back to top button