cloudburst : डेहराडूनमध्ये ढगफूटी, एसडीआरएफची टीम दाखल | पुढारी

cloudburst : डेहराडूनमध्ये ढगफूटी, एसडीआरएफची टीम दाखल

पुढारी : ऑनलाइन डेस्क : डेहराडून : cloudburst : जिल्ह्यातील रायपूर ब्लॉकमधील सरखेत गावात पहाटे २.४५ वाजता ढगफुटी cloudburst  झाल्याची घटना स्थानिकांनी नोंदवली. एसडीआरएफची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. गावात अडकलेल्या सर्व लोकांना वाचवण्यात आले तर काहींनी जवळच्या रिसॉर्टमध्ये आश्रय घेतला. cloudburst

बीड : परळी तालुक्यातील दहा गावांत ढगफुटीसदृश्य परिस्थिती

“गावात अडकलेल्या सर्व लोकांना वाचवण्यात आले तर काहींनी जवळच्या रिसॉर्टमध्ये आश्रय घेतला,” असे आपत्ती प्रतिसाद पथकाने सांगितले.

“कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डेहराडूनमधील प्रसिद्ध टपकेश्वर महादेव मंदिराजवळून वाहणाऱ्या तमसा नदीने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे माता वैष्णोदेवी गुहा योग मंदिर आणि तपकेश्वर महादेव यांचा संपर्क तुटला आहे. तसेच नुकसान झाले आहे. देवाच्या कृपेने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे मंदिराचे संस्थापक आचार्य बिपीन जोशी यांनी सांगितले.

काही वेळा, पाऊस देणाऱ्या ढगांतून खाली आलेला पाऊस जमिनीवर न पडता, जमिनीकडच्या उष्ण तापमानामुळे त्याची परत वाफ होऊन ती त्या ढगांतच सामावली जाते. ते ढग, मग तो अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करतात. त्यांच्या मार्गात एखादा डोंगर आल्यास त्यावर ते आदळून फुटतात. त्यायोगे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यास ढगफुटी म्हणतात.

दरम्यान, आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील कटरा शहरातील माता वैष्णो देवी मंदिराजवळ मुसळधार पावसामुळे पूर आला.

मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती पाहता माता वैष्णोदेवी मंदिरातील भाविकांची वर जाणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.

“मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, कटरा येथून वैष्णोदेवी मंदिराकडे भाविकांची वरची हालचाल थांबवण्यात आली आहे. खाली येणा-या यात्रेकरूंना प्राधान्य दिले जात आहे. पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आधीच तैनात करण्यात आले आहे, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने सांगितले.

भारतात आतापर्यंत 2010 मध्ये लेहमध्ये मोठी ढगफुटी झाली होती. १ मिनिट १.९ इंच (४८.२६ मिमी) इतक्या कालावधीत ढगफुटी झाली होती.

ढगफुटीमुळे हिमाचल, जम्मूमध्ये चौघांचा मृत्यू

नाशिक : ढगफुटीसदृश पावसाने चोंढी शिवारात पिके गेली वाहून

 

Back to top button