राज्यात आजपासून 3 दिवस मुसळधार; या भागात ‘रेड अलर्ट’, तर पुण्याला ‘ऑरेंज अलर्ट’ | पुढारी

राज्यात आजपासून 3 दिवस मुसळधार; या भागात ‘रेड अलर्ट’, तर पुण्याला ‘ऑरेंज अलर्ट’

पुणे : पुढारी वृत्तसेवा: गुजरात ते महाराष्ट्राची किनारपट्टी आणि पूर्व राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे कोकणसह कोल्हापूर व सातारा या भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पाऊस बरसणार असून, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै हे तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यात 6 ते 9 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कोकणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे कोकणच्या बहुतांश भागात गावागावांत पुराचे पाणी शिरले आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातही अतिवृष्टी झाली आहे, तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात त्यातुलनेत सध्या पाऊस कमी प्रमाणात बरसत आहे.

रेड अलर्ट : पालघर (8 जुलै), रायगड (6 ते 8 जुलै), रत्नागिरी (6 ते 8 जुलै), कोल्हापूर (6 ते 8 जुलै), सातारा
(6 ते 8 जुलै).

ऑरेंज अलर्ट : पालघर (6 ते 9 जुलै), ठाणे (6 ते 9 जुलै), मुंबई (6 ते 9 जुलै), रायगड (9 जुलै), सिंधुदुर्ग (6 ते 9 जुलै), नाशिक (6 ते 9 जुलै), पुणे (6 ते 9 जुलै), कोल्हापूर (9 जुलै), सातारा (9 जुलै).

यलो अलर्ट : धुळे (8 जुलै), नंदुरबार (6 ते 9 जुलै), जळगाव (8 जुलै), नगर (8 जुलै), औरंगाबाद (6 व 7 जुलै), जालना (6 व 7 जुलै), परभणी (6 व 7 जुलै), हिंगोली (6 व 7 जुलै), नांदेड (6 व 7 जुलै).

विविध अलर्ट असे
रेड अलर्ट : (अतिवृष्टी) ः 100 ते 200 मि.मी.पेक्षा जास्त पाऊस. पूरस्थितीचा धोका
ऑरेंज अलर्ट : (मुसळधार) ः 60 ते 99 मि.मी. पाऊस. घरात, रस्त्यांवर पाणी तुंबण्याचा धोका
यलो अलर्ट : (साधारण पाऊस) : 19 ते 59 मि.मी. पाऊस

गेल्या चोवीस तासांतील पाऊस (मिमीमध्ये)
कोकण- लांजा -340, माणगाव- 230, वैभववाडी-230, मालवण-230, संगमेश्वर-210, मंडणगड-210, वेगुर्ला- 210, कल्याण-190, अंबरनाथ-190, पालघर-190, महाड-190, सावंतवाडी-190, उल्हासनगर-180, पनवेल -170, चिपळूण-170, पोलादपूर-170, ठाणे-170, पेण -170, डहाणू -150, माथेरान-120, रत्नागिरे-120, तलासरी -130, मुंबई-120, कणकवली-110, वसई-110, कर्जत -100
मध्य महाराष्ट्र : गगनबावडा-260, महाबळेश्वर-150, राधानगरी-110, शाहुवाडी-90, हर्सुल -80, लोणावळा-70, चांदगड-70, वेल्हे -70, पन्हाळा-70

विदर्भ : तिरोडा- 140, तिवसा-130, साकोली, अरवी-120, सावनेर -110, गोळेगाव, मुर्सी-100, देवली-90, रामटेक-80, गोंदिया-80, धामणगाव रेल्वे-70

Back to top button