शरद पवार यांनी केले भरणे कुटुंबीयांचे सांत्वन | पुढारी

शरद पवार यांनी केले भरणे कुटुंबीयांचे सांत्वन

इंदापूर :पुढारी वृत्तसेवा: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे शुक्रवारी( दि.१ जुलै) वृध्दापकाळाने निधन झाले. आज शनिवारी (दि.२ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी भरणेवाडी येथे येऊन भरणे कुटुंबाचे सांत्वन केले. भरणे हे शेतकरी कुटुंब असून घरातील सर्व मंडळी शेतात काम करतात. त्यांचे वडिल विठोबा भरणे हे देखील अंत्यत हुशार आणि प्रगतशिल बागायतदार होते. भरणे कुटुंबावर त्यांचे आईवडिल चुलते यांनी चांगले संस्कार केले.

आजही हे सर्व एकत्रित आहे. असे पवार म्हणाले, यावेळी रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे, मधुकर भरणे आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणे ही चारही भावंडं, श्रीराज भरणे यांच्यासह सुना मुली नातवंडे, नाथ सुना व भरणे परिवार उपस्थित होता. गिरीजाबाई विठोबा भरणे यांवर मागील काही दिवसांपासून अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

Back to top button