गाझियाबादमध्‍ये पाच वर्षीय मुलगी मंकीपॉक्स संशयित ; नमुना चाचणीसाठी | पुढारी

गाझियाबादमध्‍ये पाच वर्षीय मुलगी मंकीपॉक्स संशयित ; नमुना चाचणीसाठी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पाच वर्षीय संशयित मुलीचा मांकीपॉक्स प्रकरणाचा नमुना चाचणीसाठी पाठविला गेला आहे. अंगावर पुरळ उठणे आणि खाज सुटण्याच्या तक्रारीनंतर तिची संसर्गाची तपासणी केली जात आहे. गाझियाबादच्या एका मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, ही चाचणी फक्त एक सावधगिरीच्या दृष्टीने करण्यात येत आहे. या पाच वर्षीय मुलीला इतर कोणत्याही आरोग्यविषयी समस्या जाणवत नाही. यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नाही.

सीएमओ (CMO) गाझियाबाद यांनी सांगितले की, संबंधित मुलगी परदेशात प्रवास केलेल्यांच्‍या संपर्कात आलेला नाही. त्यामुळे यामध्ये घाबरण्यासारखे नाही. “सावधगिरीचा उपाय म्हणून चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.

भारतात आत्तापर्यंत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु, मंकीपॉक्स (MPX) प्रकरणांच्या वाढत्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशभरात ‘मंकीपॉक्स संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली हाेती. त्यानुसार, मंकीपॉक्स विषाणूच्या पुष्टी झालेल्या प्रकरणाची पॉलिमरेझ चेन रिॲक्शन (पीसीआर) द्वारा व्हायरल ‘डीएनए’चा शोध घेऊन मंकीपॉक्स संबंधित प्रकरणांचा शोध घेतला जाईल, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

 

 

Back to top button