( व्‍हिडीओ ) केवळ दैव बलवत्तर : महिला रेल्‍वेखाली आली अन्… | पुढारी

( व्‍हिडीओ ) केवळ दैव बलवत्तर : महिला रेल्‍वेखाली आली अन्...

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर रुळ ओलांडत असताना रेल्वेचे हॉर्न आणि तिचा वेग पाहून घाबरलेली महिला चक्क रुळामध्ये झोपली. तिच्या अंगावरून इंजिन आणि ३ डबे पुढे निघून गेले. हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला, परंतु लोको पायलटने वेळीच गाडी थांबवल्याने तिचे प्राण वाचले. ही घटना रविवारी (दि.२९) घडली.

चिखलठाणा औरंगाबाद दरम्यान असलेल्या मुकुंदवाडी रेल्वे रुळाच्या पलीकडे राहणाऱ्या रहिवाशांना रुळ ओलांडून पलीकडे जावे लागते. येथून रोज शाळकरी मुलासह नागरिक रुळ ओलांडत असतात. रविवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास एक ४० वर्षीय महिला रुळ ओलांडत असतानाच त्या महिलेने धडधडत आणि हॉर्न वाजवत फास्ट येणारी जालना – दादर जनशताब्दी एक्सप्रेस नजरेस पडली. ती भांबावून गेली आणि चक्क दोन्ही रुळाच्या मध्ये अंग टाकून दिले. दरम्यान, ही बाब लोको पायलट अमित सिंग व धीरज थोरात यांच्या निदर्शनास येताच त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबली, पण तो पर्यंत महिलेच्या अंगावरुन इंजिन व तीन डबे पुढे निघून…आणि महिला रेल्वे खालून बाहेर आली

दरम्यान, रेल्वे थांबतच त्या महिलेचे काय झाले असावे, या चिंतेत असलेल्या नागरिकांना ती रेल्वे खालून बाहेर येण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले. तिला धीर देत कर्मचारी आणि नागरिकांनी बाहेर काढले. या घटनेमुळे रेल्वे १५ मिनिटे थांबली होती. त्यानंतर ती औरंगाबादकडे रवाना झाली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button