आजचे राशिभविष्य (दिनांक २९ मे २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक २९ मे २०२२)

मेष – महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. दिवस संमिश्र स्वरूपाचा म्हणजे ना लाभ ना तोटा असा राहील. व्यावहारिक सावधानता आवश्यक.

वृषभ – दिवसाच्या सुरुवातीस मनाविरुद्ध घटना घडतील. गुंतवणुकीस चांगला कालावधी. संयम व सामंजस्य महत्त्वाचे. परस्परांमध्ये प्रेमभाव निर्माण होईल.

मथुन – महत्त्वाची कामे पूर्वार्धात करावीत. प्रसन्न व आनंदित वातावरण राहील. गुंतवणूक नुकसानकारक ठरेल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

कर्क- योग्य दिशेने वाटचाल कराल. आनंद देणार्‍या घटना घडतील.आप्तस्वकीयांबरोबर संवाद होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. प्रवासाचे योग.

सिंह- प्रतिष्ठेला शोभणारे कार्य कराल.सौख्यकारक दिवस. आबालवृद्धांची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.

कन्या – आवडत्या लोकांची आठवण येईल. भावनिक होण्याचे प्रसंग येतील. नियमांचे पालन आवश्यक आहे. डोकेदुखीसारखे त्रास होतील.

तूळ – सुवार्ता ऐकावयास मिळेल. उष्णतेचे विकार होण्याची संभावना. डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा. आत्मविश्वासाचा अभाव.

वृश्चिक – सुखकारक दिवस. आरोग्याच्या थोड्याफार तक्रारी. संवादाने कार्यसिद्धी होईल. भागीदारीमध्ये लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात.

धनु – गुप्तशत्रूंकडून मानसिक त्रास होतील. शत्रू नामोहरम होतील. कृतज्ञता व्यक्त कराल. सज्जनांचा सहवास लाभेल. मानसिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस.

मकर – नोकरदार व व्यावसायिकांना नुकसानकारक दिवस. एकाग्रता साधेल.वादविवादापासून दूर राहा. कौटुंबिक कलह निर्माण होतील.

कुंभ – लेखक, कलाकारांना लाभदायक दिवस. वाहनविषयक अडचणी निर्माण होतील. नियमांचे पालन करा. सामंजस्य आणि संवाद महत्त्वाचा.

मीन – आत्मविश्वास कमी करणार्‍या घटना घडतील. भावंडांकडून सहकार्य लाभेल. कला-गुणांना वाव मिळेल.आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल.

Back to top button