शिरूरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; अवैधरीत्या गॅसची चाेरी करून विकणारी टोळी जेरबंद | पुढारी

शिरूरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार; अवैधरीत्या गॅसची चाेरी करून विकणारी टोळी जेरबंद

पुढारी वृत्तसेवा: गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडल्याने सामान्य नागरिक अधिकच त्रस्त झाला आहे. त्यात गॅस चाेरट्यांची भर पडली आहे. शिरूर पाेलिसांनी धडक कारवाई करत अवैधरीत्या गॅसची चाेरी करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करत चाैघांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी (दि. २३) पहाटे ही कारवाई केली. एकूण ११ लाख ४ हजार ६५० रुपयांचा माल येथे मिळून आला.

Unmarried People Heart failure : अविवाहित हृदयविकारांच्या रुग्णात मृत्यूचे प्रमाण जास्त : युरोपमधील अभ्यास

अमोल निवृत्ती फुलसुंदर (रा. मलठण, ता. शिरूर), मलप्पा आमोशीद नरवटे, बसवराज लक्ष्मण जानाजे, सिध्दाराम विठ्ठल बिराजदार (सर्व रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे) अशी अटक व्यक्तींची नावे आहेत. लहान-माेठे असे एकूण ३७६ सिलिंडर, एकूण ४० पीन, एक इलेक्ट्रिक वजनकाटा, दोन लोंखडी टाक्या, दोन भट्टी, शेगडी, एक लायटर तसेच महिंद्रा पिकअप व महिंद्रा जेनीयू अशा दोन गाड्या सापडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पिनच्या कनेक्टरच्या सहाय्याने घरगुती सिलिंडरमधील गॅस काढून व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरत असल्याचा प्रकार मलठण (ता. शिरूर) गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. २३) पहाटे उघडकीस आला. येथे छापा टाकत पाेलिसांनी वरील चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

China Taiwan Conflict: चीनचा तैवानवर हल्ल्याचा प्लॅन : ऑडिओ क्लिपने जगभर खळबळ ; अमेरिकेचा गंभीर इशारा

पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक फौजदार नजिम पठाण, पोलिस नाईक अनिल आगलावे, राजेंद्र गोपाळे, विशाल पालवे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी सहायक फौजदार पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नाेंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करीत आहेत. तसेच याबाबत शिरूर तालुका दंडाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.

जप्त केलेले सिलिंडर-

भारत गॅस- ८०

एचपी गॅस- १००

व्यावसायिक सिलिंडर- ९३

छोटे सिलिंडर- ३

Back to top button