Exercise : दररोज अर्धा तास व्यायाम पुरेसा आहे का? संशोधक काय सांगतात…  | पुढारी

Exercise : दररोज अर्धा तास व्यायाम पुरेसा आहे का? संशोधक काय सांगतात... 

पुढारी ऑनलाईन डेस्क :

 निरोगी राहण्यासाठी दररोज  व्यायाम (Exercise) आवश्यक आहे. हे वाक्य नेहमी कानावर पडत. दररोज किती तास व्यायाम करावा,  याचं प्रत्येकाचे गणित वेगळ असतं. कोणाला अतिरिक्त व्यायामाची तर कोणाला काही मिनिटे व्यायाम पुरेसा वाटतो. मात्र दरराेज किती तास व्‍यायाम करावा यावर आजवर सखाेल संशोधन झालं आहे. जाणून घेवूया, यासंदर्भात संशोधक काय म्हणतात ते…

प्रत्येकाला दीर्घायूष्यी व्‍हावे, असं  वाटतं असतं; पण त्यांनामध्‍ये दरराेज व्यायाम किती तास करावा, दरराेज ताे करालाच पाहिजे का?, त्‍यामुळे वजन कमी होते का?, सकाळी करावा की सायंकाळी? असे अनेक प्रश्‍न विचारले जातात.

आठवड्याला किमान १५० मिनिटे व्यायाम आवश्‍यकच

वर्षोनवर्षे  व्यायाम या विषयावर संशाेधन हाेत आहे. २००८ मध्ये काही व्यायाम अभ्यास गटाने अमेरिकन व्यायाम मार्गदर्शकांनूसार माणसाचं बसणे, फिरणे, व्यायाम यावर सखाेल संशाेधन केले. अशाच प्रकारचे संशाेधन  २०१८ या वर्षीही झालं. दोन्ही वर्षी एक कॉमन फॅक्ट होता तो म्हणजे एका आठवड्यात किमान १५० मिनिटे व्यायाम करणे आवश्‍यक आहे. तो जर तुमच्या शरीरासाठी त्रासदायक ठरत असेल तर किमान त्याच्यापेक्षा अर्धा म्‍हणजे किमान ७५ मिनिटे व्यायाम आवश्‍यक आहे.

दीर्घायुष्यासाठी आठवड्यातून किमान १५० मिनीटे व्यायाम करणे पुरेसा आहे, असा निष्‍कर्ष हार्वर्ड विद्‍यापीठातील टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील शास्‍त्रज्ञ डॉ. आय. मिन ली यांनी मांडला हाेता. अनेक लोकांच्या हालचाली आणि त्यांच्या आरोग्याचा अभ्यास करुन त्‍यांनी हे निष्कर्ष नोंदवले हाेते.

आठवड्यातील १५० मिनिटांतील ३० मिनिटे दमछाक करणारा व्यायाम करायला हवा. याचे बरेच फायदे हाेतात. तुम्हाला जर काही आजार असतील तर ते होण्याची शक्यता कमी असतील, ह्रदयविकाराचा धोका कमी संभवतो, मधुमेह टाईप २, विविध प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी हाेते, असा निष्कर्ष ओस्लो येथील नॉर्वेजियन स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्समधील शास्‍त्रज्ञ उल्फ ऍलन यांनी नाेंदवला आहे.

लसीकरणासाठी सक्ती नको; निर्बंध मागे घ्यावेत, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Exercise छोट्या छोट्या क्रियात व्यायाम करा

तुम्ही तुमचा व्यायाम लहान भागांमध्ये विभाजित करू शकता. शारीरिक हालचाली आणि आरोग्याचा अभ्यास करणारे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील व्यायाम अभ्यासक इमॅन्युएल स्टामाटाकिस यांनी म्‍हटलं आहे की, “व्यायाम ३०मिनिटांच्या सत्रात केला जातो किंवा दिवसभरात लहान सत्रांमध्ये केला जातो याने काही फरक पडत नाही.  पण अलीकडच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की १५० साप्ताहिक मिनिटांचा मध्यम व्यायाम सर्वोत्कृष्ट ठरू शकतो, “बर्‍याच लोकांना आपल्या कामांदरम्यान काही  बारा-एक मिनिटे किंवा दोन मिनिटांच्या चालू शकताे किंवा पळू शकता व्यायाम विभाजीतही करु शकता उदा अत्यंत जलद चालणे, पायऱ्या चढणे आणि शॉपिंग बॅग्ज घेऊन जाणे यासारख्या हालचाली व्यायामाच्या उत्कृष्ट संधी देतात.

तुम्ही तुमचा व्यायाम रविवार-शनिवार करु शकता

तुम्ही जर ऑफिसला जात असाल किंवा कामातून वेळ कमी मिळत असेल तर तुम्ही तुमचा व्यायाम रविवार-शनिवार करु शकता, यामुळे अकाली मृत्‍यू हाेण्‍याचा धाेका कमी हाेताे, असा निष्‍कर्ष २०१७ मध्‍ये डॉ. स्टामाटाकिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे मांडला हाेता.

तुमची पावले मोजा

तुम्ही तुमचा व्यायाम काही मिनिटांऐवजी पायऱ्यांमध्ये मोजल्यास तरी चालेल. “आठवड्यातून १५० मिनिटांचा व्यायाम हा तुम्ही  दिवसाला चाललेल्या सुमारे ७,००० ते ८,००० पावलांएवढा असतो.  ‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात डॉ. ली आणि डॉ. एकेलंड  यांनी म्हटलं हाेतं की, ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी पायऱ्यांची संख्या साधारणपणे दिवसाला सुमारे ८,००० ते १०,००० असावी. ६० हून अधिक असलेल्या लोकांसाठी दिवसाला सुमारे ६,००० ते ८,००० पायऱ्या चालायला हव्यात.

एक मात्र नक्‍की निराेगी राहण्‍यासाठी व्‍यायाम आवश्‍यकच तसेच ताे नियमित असणे गरजेचे आहे.

Back to top button