Hate Speeches : 'हेट स्पीच'संबंधी याचिकेवर ९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

Hate Speeches : 'हेट स्पीच'संबंधी याचिकेवर ९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशात मुस्लिमांविरोधात द्वेषयुक्त वक्तव्य (हेट स्पीच, Hate Speeches ) करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणाऱ्या याचिकेवर ९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. जमीयत उलेमा-ए-हिंद यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर धर्म संसदेच्या याचिकेसोबतच सुनावणी घेण्यात येणार आहे.

मोहम्मद पैगंबरांच्या व्यक्तिमत्वावर सातत्याने कथितरित्या करण्यात येणारे हल्ले तसेच देशातील विविध भागांमध्ये काही लोकांकडून मुस्लिमांवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांसंबंधीत (हेट क्राईम) प्रकरणात न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करीत कायदेशी कारवाईची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

Hate Speeches : याचिकेतून केंद्राला निर्देश देण्याची विनंती

जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना सैय्यद महमूद असद मदनी यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केंद्र सरकारला यासंबंधीची निर्देश देण्याची विनंती न्यायालयासमक्ष करण्यात आली आहे. हेट स्पीच विशेषत: मोहम्मद पैगंबरांच्या व्यक्तिमत्वासंबंधी करण्यात येणाऱ्या वक्तव्यांसंबंधी राज्यांकडून करण्यात आलेल्या कारवाईंचा अहवाल मागवून घेण्याची विनंती देखील न्यायालयाकडे करण्यात आली आहे. वकील एम.आर.शमशाद यांच्या वतीने दाखल याचिकेतून देशभरातील हेट स्पीच संबंधीत गुन्ह्यांसंबंधी करण्यात आलेल्या तक्रारीला एकत्रित करीत स्वतंत्र तपास समिती स्थापन करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button