सोलापूर : जोडभावी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे; राज्यातील पाच ठाण्यांमध्ये समावेश | पुढारी

सोलापूर : जोडभावी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे; राज्यातील पाच ठाण्यांमध्ये समावेश

सोलापूर पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पाच पोलिस ठाण्यांची सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्यातील गुन्हेगारीला प्रतिबंध घालणाऱ्या ,कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस ठाणे म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचा समावेश आहे. अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

कायदा व सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध दोषसिद्धी यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी निवड करण्याचा घेण्यात आला होता. देशपातळीवर १० सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता. यासाठी राज्यातील पोलीस ठाण्यांची निवड देशपातळीवर करण्याच्या उद्देशाने ही निवड करण्यात आली. राज्यातील पाच पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी समित्यांची निवड करण्यात आली होती.

समितीच्या अहवालानुसार राज्यातील पाच सर्वोत्कृष्ट ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे, औरंगाबाद शहरातील वाळूज पोलीस ठाणे, यवतमाळमधील बाभूळगाव पोलीस ठाणे, जालनामधील सेवली पोलीस ठाणे आणि अहमदनगरमधील राजूर पोलीस ठाण्याची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button