Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न | पुढारी

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना विचारला प्रश्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) साशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ते त्यांच्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून संवाद साधतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे.

अमिताभ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फीडवर एक ब्लॅक अँड व्हाईट थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अमिताभ उभे असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांनी शॉर्ट ड्रेस घातला आहे. एका हाताने अमिताभ यांच्या कमरेला कोणाचा तरी हात दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देत अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना विचारले, “हा हात कोणाचा आहे?” (Amitabh Bachchan)

यावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी “कायद्याचा हात आहे” असे म्हटले. बर्‍याच चाहत्यांनी लिहिले की “हा अमिताभ यांची ‘धर्म पत्नी’ अभिनेत्री जया बच्चनचा हात होता”, तर काहींनी विनोदाने “हा हात रेखाजींचे हात होते” अस म्हटलं आहे. (Amitabh Bachchan)

काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा हात आहे. हा फोटो १९८४ मध्ये आलेला चित्रपट इंकलाबच्या सेटवरील आहे. या चित्रपटात अमिताभ (Amitabh Bachchan) आणि श्रीदेवी मुख्‍य भूमिकेत होती. फोटोत श्रीदेवीने अमिताभचा बेल्ट पकडलेला दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करून चाहत्यांना विचारला प्रश्न
अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करून चाहत्यांना विचारला प्रश्न

हेही वाचलं का?

Back to top button