Ratan TATA : रतन टाटा आणि रॉकस्टार स्लॅश भेटल्यावर बॉलिवूड अभिनेत्यांना का वाटले आश्चर्य? | पुढारी

Ratan TATA : रतन टाटा आणि रॉकस्टार स्लॅश भेटल्यावर बॉलिवूड अभिनेत्यांना का वाटले आश्चर्य?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे नामांकित उद्योगपती रतन टाटा (Ratan TATA) सोशल मीडियावर चांगलेच ॲक्टिव्ह असतात. टाटांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामुळे बॉलिवूड अभिनेत्याच्या भुवया उंचावल्या आहेत. गन्स एन’ रोझेस गिटार वादक शॉल हडसन उर्फ ​​स्लॅशसोबत टाटांनी आपला एक फोटो शेअर केला आहे.

इन्स्टावर फोटो शेअर करत टाटा म्हणाले, मी कॅलिफोर्नियाच्या दौऱ्यावर असताना माझी स्लॅशसोबत भेट झाली. टाटा आपल्या जग्वार एक्सकेआर शोरूमच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी स्लॅशसोबत त्यांनी बराच वेळ आम्ही चर्चा केल्याचे टाटा म्हणाले. याचबरोबर आम्ही फोटो ही घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

माझ्या शोरूमध्ये फिरत असताना स्लॅश तिथे आले यावेळी त्याला भेटून मला आनंद झाल्याचेही टाटा म्हणाले. त्यांनी आमची जग्वार एक्सकेआर ही गाडी घेतली. स्लॅश हा अतिशय विनम्र व्यक्ती असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांचे फोटो सोबत असलेल्या ब्रायन एलन यांनी त्यांचे फोटो काढल्याचेही टाटा म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ratan Tata (@ratantata)

हा फोटो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. रतन टाटा यांना स्लॅशसोबत फ्रेम शेअर करताना पाहून रणवीर सिंग, डिनो मोरिया आणि इतर अनेक सेलिब्रिटींनाही आश्चर्य वाटले. यावर रणवीरने “वाह! खूप छान असे बोलले आहे.

Back to top button