ग्रीन आलू | पुढारी

ग्रीन आलू

बटाटा हा सर्वसामान्यपणे सर्वांनाच रुचणारा असा आहे. म्हणूनच बटाटयाचा वापर आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात विविध प्रकारे होत असतो. भाज्या-उसळींमध्ये, आमटी-रश्यांमध्ये, भाताच्या प्रकारांमध्ये तर चवीसाठी बटाटा घातला जातोच, परंतु बटाटयाचा समावेश प्रामुख्याने असणारे अनेक पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत. आज पाहूयात बटाट्याचा एक हटके प्रकार ग्रीन आलू.

ग्रीन आलूसाठी लागणारे साहित्य : छोट्या आकाराचे अर्धा किलो बटाटे, एक वाटी पुदिना पाने, एक—दोन वाटी कोथिंबीर, एक छोटा चमचा आले लसून पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या, दोन डाव तेल, मीठ, हळद.

कृती :

संबंधित बातम्या

सर्वप्रथम बटाटे उकडून साल काढून बटाट्याला काट्याने टोचा मारून घ्याव्यात. पुदिना, कोथिंबीर, मिरची बारीक वाटून त्यात मीठ, आले लसून पेस्ट मिसळावी. हे मिश्रण बटाट्याला चोळून दोन तास ठेवावे. नंतर दोन डाव तेलाची फोडणी करून त्यात बटाटे घालून झाकण न ठेवता दहा मिनिटे परतावेत.

Back to top button