US Campus Protests : कोलंबिया विद्यापीठातील पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थ्यांवर मोठी कारवाई | पुढारी

US Campus Protests : कोलंबिया विद्यापीठातील पॅलेस्टाईन समर्थक विद्यार्थ्यांवर मोठी कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रतिष्ठित हॅमिल्टन हॉल या इमारतीतील पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांना (Columbia Protests) पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. निदर्शकांनी २० तासांपासून ही इमारत ताब्यात घेतली होती. न्यूयॉर्क शहरातील पोलिसांनी कॅम्पसमध्ये प्रवेश केलेल्या अनेक आंदोलकांना अटक केली आहे.

पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थी (Columbia Protests) संपूर्ण अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये निदर्शने करत आहेत. अनेक दिवसांपासून विद्यार्थी विद्यापीठ परिसरात आंदोलन करत आहेत. पोलिस वारंवार विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून बाहेर पडण्याचे आवाहन करत आहेत. कोलंबिया विद्यापीठाने विद्यार्थ्यांना निलंबित करण्यास सुरुवात केली आहे. टेक्सास विद्यापीठातील आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे.

कोलंबिया विद्यापीठात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून इमारतीवर कब्जा करणाऱ्या निदर्शकांवर (Columbia Protests) पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. कोलंबिया विद्यापीठातून सुरू झालेले हे आंदोलन अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये पसरले आहे. हजारो विद्यार्थी इस्रायलवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. पोलिसांकडून आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

१८ एप्रिल रोजी कोलंबिया विद्यापीठात पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांना सामूहिक अटक झाल्यापासून टेक्सास, उटा, व्हर्जिनिया, नॉर्थ कॅरोलिना, न्यू मेक्सिको, कनेक्टिकट, लुईझियाना, कॅलिफोर्निया आणि न्यू जर्सी या राज्यांमधील कॅम्पसमध्ये १ हजारहून अधिक निदर्शकांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button