फोटो काढायला गेली आणि थेट ज्वालामुखीतच पडली | पुढारी

फोटो काढायला गेली आणि थेट ज्वालामुखीतच पडली

जकार्ता ः वृत्तसंस्था : सल्फ्युरिक वायूंमुळे सतत निळ्या ज्वाळा सोडणार्‍या व कायम धुमसत राहणार्‍या ज्वालामुखीच्या काठावर उभे राहून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणार्‍या एका चिनी पर्यटक महिलेचा पाय घसरला आणि ती थेट ज्वालामुखीतच कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना इंडोनेशियात घडली.

शनिवारी इंडोनेशियाच्या इजेन येथील ज्वालामुखीमध्ये ही घटना घडली. या भागात अनेक मृत व अर्धवट धुमसणारे ज्वालामुखी आहेत व ते पर्यटकांना पाहता येतात. अशाच ब्लू फायर नावाने ओळखला जाणारा ज्वालामुखी पाहण्यासाठी पर्यटकांचा एक गट आला होता. त्यातील हुआंग लिहाँग ही चिनी पर्यटक महिला ज्वालामुखीच्या काठावर उभे राहून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेला व ती थेट ज्वालमुखीच्या विवरात पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. विवरात उतरून तिचा शोध घेतला असता दोन तासांनी 75 मीटर खोलवर तिचा मृतदेह सापडला.

Back to top button