Henry Kissinger : अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन  | पुढारी

Henry Kissinger : अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन 

पुढारी ऑनलाईन डेस्क : युनायटेड स्टेट्सचे माजी मंत्रीसचिव, नोबेल विजेते हेन्री किसिंजर  हेन्री किसिंजर यांचे बुधवारी (दि.२९) निधन झाले. कनेक्टिकट येथील त्यांच्या घरी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याबबत किसिंजर असोसिएट्स इंक यांनी निवेदन देत माहिती दिली. (Henry Kissinger)

भारत-पाक युद्धादरम्यान वादग्रस्त भूमिका

किसिंजर यांचा जन्म 1923 मध्ये जर्मनीमध्ये झाला. 1938 मध्ये ते अमेरिकेत आले. नंतर, 1943 मध्ये, ते अमेरिकन नागरिकत्व स्विकारले. त्यानंतर तीन वर्षे अमेरिकन सैन्यात सेवा केली. याशिवाय त्यांनी काउंटर इंटेलिजन्स कॉर्प्समध्येही काम केले आहे. बॅचलर, मास्टर्स आणि पीएचडी पदवी मिळवल्यानंतर त्यांनी हार्वर्डमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवला. 1969 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली. हे पद त्यांच्यासाठी खूप महत्त्वपुर्ण ठरले.   किसिंजर भारत-पाक युद्ध  1971 दरम्यान चर्चेत होते. युद्धादरम्यान त्यांची भूमिका खूप वादग्रस्त होती. या युद्धामुळे बांगलादेश हा स्वतंत्र देश जगाच्या नकाशावर उदयास आला.

 100 वा वाढदिवस साजरा

किसिंजर यांनी रिचर्ड निक्सन आणि जेराल्ड फोर्ड या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. यंदा 27 मे रोजी त्यांनी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. हेन्री किसिंजर हे आधुनिक अमेरिकन इतिहासातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेत. व्हिएतनाम युद्ध संपवण्यात आणि अमेरिकन सैन्याच्या माघारीत त्यांनी मोठी भूमिका बजावली.

हेही वाचा 

Back to top button