State Cabinet : अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई ते अल्पसंख्याक महामंडळासाठी शासन हमी : जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

State Cabinet : अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई ते अल्पसंख्याक महामंडळासाठी शासन हमी : जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : अवकाळी पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. भरपाई देण्यासाठी २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर पर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय आज (दि.२९) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंत्रालयात आज दुपारी प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. State Cabinet

  State Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी ५०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय
  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार
  • झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा
  • राज्यात 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा
  • मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार
  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली
  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन
  • 'महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना – २०२३' राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार
  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news