दहशतवाद्यांच्या पायावर जीपीएस | पुढारी

दहशतवाद्यांच्या पायावर जीपीएस

श्रीनगर; वृत्तसंस्था : दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या करडी नजर ठेवण्यासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांनी जीपीएस प्रणाली (अँकलेट) बसवण्यास सुरुवात केली आहे. अशी प्रणाली राबवणारे जम्मू-काश्मीर पोलिस हे देशातील पहिले पोलिस दल ठरले आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या गुलाम मोहम्मद याच्या पायावर भारतातील पहिला जीपीएस ट्रॅकर बसवण्यात आला आहे.

गुलाम हा 2007 मधील टेरर फंडिंग प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्या घोट्याला जीपीएस प्रणाली अंतर्गत कुलूप घातले आहे. यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाकडून त्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. जामीन, पॅरोल आणि नजरकैदेत असलेल्या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांसारख्या देशांमध्ये अशा प्रणालीचा वापर केला जात आहे. त्यामुळे तुरुंगातील कैद्यांची गर्दी कमी होत आहे. जम्मूच्या विशेष एनआयए न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुलामला जीपीएस ट्रॅकर बसवले आहेत. गुलाम हा उधमपूर हल्ल्यात यूएपीए अंतर्गत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. अडीच लाख रुपयांचे टेरर फंडिंग करत असताना गुलामला पकडण्यात आले होते. गुलाम हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित आहे. एनआयए आणि दिल्ली पटियाला हाऊस कोर्टानेही त्याला दहशतवादी कटाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे आणि त्याने 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगली आहे.

गृह मंत्रालयाकडून सूचना

या वर्षीच्या 24 ऑगस्ट रोजी गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीनेही तुरुंगातील सुधारणांबाबत अहवाल सादर केला होता. यामध्ये त्यांनी जामिनावर सुटलेल्या कैद्यांसाठी फायदेशीर ब्रेसलेट किंवा जीपीएस ट्रॅकर बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा शोध घेण्याचे सुचवले होते.

Back to top button