फ्रान्स-भारत लष्करी सामर्थ्य वाढवणार | पुढारी

फ्रान्स-भारत लष्करी सामर्थ्य वाढवणार

पॅरिस, वृत्तसंस्था : राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात उभय देशांमधील लष्करी संबंध बळकट करण्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. याशिवाय दोन्ही देशांमध्ये अपांरपरिक ऊर्जा, आर्टिफिशिएल इंटेलिजन्स, सेमीकंडक्टर्स, डिजिटल तंत्रज्ञान आदी क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्याबाबतच्या करारांवरही स्वाक्षरी झाली.

बॅस्टिल डे सोहळ्यानंतर मॅक्रॉन यांनी मोदी यांचे त्यांच्या पॅलेसमध्ये राजेशाही थाटात स्वागत केले. यानंतर उभयतांमध्ये राजनैतिक पातळीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेमध्ये दहशतवादाचा मुद्दाही केंद्रस्थानी होता. बॅस्टिल डे सोहळ्यात दोन्ही देशांमधील चित्तथरारक कवायतीमधून हवाई दलाने सलामी दिली. यामधून दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ्य मजबूत असल्याचे दिसून आले आहे. यूपीआय आणि भारतीय विद्यार्थ्यांना दीर्घ मुदतीचा व्हिसा दिल्याबद्दल मोदी यांनी मॅक्रॉन यांचे आभार मानले.

फ्रान्सच्या विद्यार्थ्यांनाही भारताची द्वारे मुक्त करणार असल्याची ग्वाही मोदी यांनी यावेळी दिली. फ्रान्स हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधाना 25 पूर्ण झाली आहेत. यापुढील 25 वर्षांतही दोन्ही देशांतील संबंध आणखी वद्धिंगत होतील, असा विश्वासही मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केला.

Back to top button