कोल्हापूर : कळंबा कारागृहात पुन्हा 12 मोबाईल | पुढारी

कोल्हापूर : कळंबा कारागृहात पुन्हा 12 मोबाईल

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विवेक झेंडे यांनी 12 तासांत कारागृहातील बरॅकच्या घेतलेल्या झडतीत 12 मोबाईल आढळून आल्याने कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. कारागृहातील तपासणी मोहीम यापुढेही तीव— करण्यात येईल, असे झेंडे यांनी सांगितले.

कळंबा कारागृहातील गैरकृत्यांना रोखण्यासाठी दीड महिन्यापासून शोधमोहीम राबविली जात आहे. या काळात 80 मोबाईल, बॅटर्‍या, चार्जरसह अनेक संशयास्पद वस्तू विशेष पथकाच्या हाताला लागल्या आहेत. कारागृहातील गैरकृत्याची दखल घेत 2 वरिष्ठ अधिकार्‍यांसह 11 जणांना आठवड्यापूर्वी सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. कारागृहाचे नवे अधीक्षक म्हणून विवेक झेंडे यांची दोन दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी बरॅकची तपासणी सुरू केली. त्यात 12 मोबाईल आढळून आले. झेंडे यांनी यापूर्वी आर्थर रोड, तळोजा, अमरावती, बिंदू चौक या ठिकाणी कामगिरी बजावली आहे.

Back to top button