Titanic tourist submarine : ‘त्या’ पानबुडीला जलसमाधी! टायटॅनिक जवळ सापडला संशयास्पद ढिगारा | पुढारी

Titanic tourist submarine : 'त्या' पानबुडीला जलसमाधी! टायटॅनिक जवळ सापडला संशयास्पद ढिगारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अटलांटिक महासागरात बुडालेली पाणबुडी बेपत्ता होऊन ९६ तासांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे टायटॅनिक जहाज पहायला (Titanic tourist submarine) गेलेल्या पानबुडीला जलसमाधी मिळाल्याचे जवळ जवळ स्पष्ट झाले आहे. सध्या या पानबुडीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता पानबुडीच्या अवशेषांचा ढिगारा (Debris Field) सापडला आहे.

ओशियन गेटच्या पानबुडीतून एकूण ५ पर्यटक टायटॅनिक जहाज (Titanic tourist submarine) पहायला गेलेले होते. सोमवारी (दि. १९) ही पानबुडी पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली. तटरक्षक दल या पानबुडीचा शोध घेत आहे. तब्बल चार दिवस होऊनही ही पानबुडी अद्याप सापडलेली नाही. तसेच याबाबत कोणतीही ठोस माहिती आज सकाळपर्यंत मिळालेली नव्हती. मात्र आज बेपत्ता जहाजाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. आज (दि. २२) या पानबुडीतील ऑक्सिजनचा (Oxygen storage in a submarine)  साठा संपला आहे. त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार  टायटॅनिक जहाजाजवळ बेपत्ता पानबुडीचे काही अवशेष सापडलेले आहेत.

समुद्राच्या तळातून येणाऱ्या ध्वनी लाटांच्या आधारे पाणबुडीचा शोध

अमेरिकेच्या तटरक्षक दलाने (US Coast Guard) गुरुवारी सांगितले की, कॅनडाच्या एका जहाजाने पाठवलेला रोबोट समुद्राच्या तळापर्यंत पोहोचला आहे. आणि त्याने पाणबुडीचा शोध सुरू केला आहे. अधिकार्‍यांना आशा आहे की समुद्राच्या तळातून येणाऱ्या ध्वनी लाटा पाणबुडीचा शोध घेण्यास मदत करू शकतील. समुद्रप्रवासाचे नेतृत्व करणाऱ्या Oceangate Expeditions 2021 च्या सागरी प्रवासांद्वारे महासागराच्या आत टायटॅनिकच्या आसपासच्या वातावरणाचा अभ्यास करत आहे.

‘या’ किनाऱ्याजवळ पाणबुडी झाली बेपत्ता : New foundland, Canada

जगातील सर्वात लोकप्रिय जहाज टायटॅनिकचे (Titanic tourist submarine) अवशेष दाखवण्यासाठी मध्य अटलांटिक महासागरात रविवारी (दि.१८) पर्यटकांना घेऊन गेलेली पाणबुडी अद्यापही बेपत्ता आहे. ही पाणबुडी कॅनडाच्या न्यूफाउंडलँड किनाऱ्याजवळ बेपत्ता झाली होती. पाच व्यक्ती सिफर्ट टायटन नावाच्या पाणबुडीतून अटलांटिक महासागरात बुडालेल्या या जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, ही पाणबुडी बेपत्ता झाली. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न केला जात आहे. बचावकर्त्यांसमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे.

बेपत्ता पाणबुडीतील पाच जणांचा समावेश

बेपत्ता पाणबुडीतील पाच जणांमध्ये ब्रिटिश अब्जाधीश हमिश हार्डिंग, पाकिस्तानी टायकून शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा यांचा समावेश आहे. 10 हजार 432 किलो वजन असलेल्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी बहुराष्ट्रीय ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या ऑपरेशनअंतर्गत, यूएस कोस्ट गार्ड, कॅनडाची लष्करी विमाने, फ्रेंच जहाजे आणि टेलीगाइड रोबो इत्यादींचा शोध मोहिमेसाठी वापरल केला जात आहे.

टायटन पाणबुडीची जबाबदारी कुणाकडे? Missing Titanic Submarine

टायटॅनिक जहाजाचे बुडालेले अवशेष दाखवण्यासाठी गेलेल्या पाणबुडीची जबाबदारी पोलर प्रिन्स नावाच्या जहाजाने घेतली आहे. पोलर प्रिन्स जहाजाने टायटन पाणबुडीला (Titan submarine) उत्तर अटलांटिक महासागरात नेले. यानंतर टायटॅनिकच्या अवशेषापर्यंत पोहोचल्यावर पाणबुडी पाण्यात उतरवली जाते. या पाणबुडीत एकावेळी फक्त चार ते पाच प्रवासी बसतात. यानंतर, पाणबुडी 4000 मीटर खोलीवर पडलेल्या टायटॅनिकच्या अवशेषासाठी रवाना झाली. पोलर प्रिन्स जहाज टायटन पाणबुडीच्या संपूर्ण प्रवासासाठी कमांड आणि कंट्रोल स्टेशन म्हणून काम करते.

हेही वाचा

Back to top button