प्रज्वल रेवण्णाची आई भवानी यांना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

प्रज्वल रेवण्णा
प्रज्वल रेवण्णा

बेंगलुरू : पुढारी ऑनलाईन कर्नाटकातील चर्चित सेस्‍क स्‍कँडलमध्ये फसलेल्‍या जेडीएस नेता प्रज्‍वल रेवन्नाची आई भवानी रेवन्ना यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अपहरण प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने जेडी(एस)चे निलंबित नेते प्रज्वल रेवण्णा यांची आई भवानी रेवण्णा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्‍यांना म्हैसूर आणि हसनमध्ये दौरा न करण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भवानी रेवण्णा यांच्यावर कोणते आरोप?

भवानी रेवण्णा या एचडी रेवण्णा यांची पत्‍नी आणि प्रज्‍वल रेवण्णाची आई आहेत. भवानी रेवण्णा यांच्यावर आरोप आहे की, त्‍यांनी प्रज्‍वल रेवण्णाने कथीतरीत्‍या ज्‍या महिलेचे लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. त्‍या महिलेचे अपहरण केले, जेणेकरून त्‍या महिलेला तक्रार करण्यापासून रोखता येईल.

विशेष सरकारी वकील रवी वर्मा कुमार यांनी यापूर्वी सांगितले होते की, भवानी या संपूर्ण अपहरण प्रकरणाच्या सूत्रधार होत्‍या. कर्नाटकच्या या सेक्स स्कँडलबाबत कर्नाटक सरकारने प्रज्वलच्या विरोधात तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती.

प्रज्‍वल रेवण्णाचे आतापर्यंत वेगवेगळ्या मुलींसोबतचे २५०० हून अधिक अश्लील व्हिडिओ क्‍लिप समोर आले आहेत. तपास यंत्रणांना एक पेन ड्राईव्ह मिळाला आहे. ज्‍यामध्ये रेवण्णाशी संबंधित अश्लिल व्हिडिओ आहेत. जेडीएस नेता प्रज्‍वल रेवण्णाच्या विरोधात आतापर्यंत ३ वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्‍या आहेत. सध्या प्रज्‍वल रेवन्ना हा पोलिस कोठडीत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news