पाकमध्ये तांदूळ 330 रुपये किलो! | पुढारी

पाकमध्ये तांदूळ 330 रुपये किलो!

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानमध्ये अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांचे दर आकाशाला भिडले आहेत. गरिबांची उपासमार सुरू आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. बिर्याणीला पाकिस्तान्यांची पहिली पसंती असते. पण, या देशात तांदूळही महाग झाल्याची परिस्थिती पवित्र रमजानमध्ये ओढविली आहे.

बाजार करायचा तर नोटांच्या एका गड्डीत साधी पिशवीही भरत नसल्याची स्थिती आहे. गेल्या आठवड्यातील तांदळाचा 300 रुपये किलो दर आज 335 रुपयांवर गेला आहे. तत्पूर्वी पाकिस्तानात तांदळाचा दर 70 रुपये किलो होता. म्हणजेच तांदूळ दरात तब्बल पाच पटींनी वाढ झालेली आहे. महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. चिकनही 350 रुपये किलोने विकले जात आहे. कुटुंबासाठी बिर्याणी बनवायची तर तांदूळ आणि चिकन हेच 700 रुपयांत पडते. बहुतांश लोकांची एवढी कमाईही दिवसाला नाही.

 फळेही महागली

संत्री 440 रुपये किलो, डाळींब 400 रुपये किलो, सफरचंद 340 रुपये किलो, कोहाटी पेरू 350 रुपये किलो, स्ट्रॉबेरी 280 रुपये किलो अशा दराने फळे मिळत आहेत.

 

Back to top button