जगण्‍याशी ‘तिची’ नाळ घट्ट, भूकंपालाही ‘ती’ पूरुन उरली! | पुढारी

जगण्‍याशी 'तिची' नाळ घट्ट, भूकंपालाही 'ती' पूरुन उरली!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आईच्‍या गर्भात ती सुरक्षित वाढतं होती… धरणी फाटली आणि क्षणात होत्‍याचं नव्‍हतं झालं.. धरणीकंप झाल्‍यानंतर तिची आई ढिगार्‍याखाली गाडली गेली.. तिला जन्‍म दिला आणि आईने आपला प्राण सोडला.. तब्‍बल ३० तासांनंतर बचाव पथक घटनास्‍थळी आलं. या पथकाने नाळ तोडून आईचा मृतदेह ढीगार्‍याखालून काढला आणि जखमी नवजात बालिकेला रुग्‍णालयात दाखल केले..माय-लेकींच्‍या जीवनातील जन्‍म-मृत्‍यूचा ह्‍दयद्रावक योगायोग सीरियामध्‍ये घडला आहे. तब्‍बल ३० तास मृत्‍यूशी झूंज देत भूकंपालाही पूरन उरलेल्‍या बालिका जगभरातील चर्चेचा विषय ठरली आहे. (Turkey-Syria Earthquake)

शक्‍तीशाली भूकंपानंतर तुर्कस्‍तान आणि सीरियात हजारो नागरिक ढिगार्‍याखाली अडकले गेले. आतापर्यंत ८०००
हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे झालेल्या महाविनाशानंतर अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत.

ढीगार्‍याखाली झाली प्रसूती

न्‍यूयॉर्क टाइम्‍सने दिलेल्‍या वृत्तानुसार, शक्‍तीशाली भूकंपानंतर सीरियातील जिंदेरेस शहरात राहणार्‍या ३४ वर्षीय गर्भवती खलील अल शमी ढिगार्‍याखाली गाडल्‍या गेल्‍या. दोनच दिवसांमध्‍ये त्‍यांची प्रसूती होणार होती. त्‍या आपल्‍या भावाच्‍या घरी राहत होत्‍या. भूकंपात घर उद्‍ध्‍वस्‍त झाले. काही क्षणात घराचे ढिगार्‍यात रुपांतर झाले. बचाव पथक आले. ढिगारा उपसत असताना त्‍यांना एक गोंडस मुलगी दिसली. खलील शमी यांची प्रसूती झाल्‍याचे दिसले, मात्र ढिगार्‍याखाली दबल्‍यामुळे त्‍यांचा मृत्‍यू झाला होता. बचाव पथकाने नाळ कापली आणि तब्‍बल ३० तासांहून अधिक काळ नवजात बालिकेला रुग्‍णालयात दाखल केले. माय-लेकींच्‍या जीवनातील जन्‍म-मृत्‍यूचा ह्‍दयद्रावक योगायोगाने सारे सीरिया हळहळत आहे.

तुर्कस्‍तान आणि सीरियात युद्‍धपातळीवर मदत कार्य सुरु आहे.  भूकंपाच्या केंद्राजवळील मालत्या परिसरातील शेकडो इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्यांवर बर्फवृष्टी होत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

हेही वाचा :

Back to top button