Turkey : भूकंपामुळे तुर्कस्तानातील जागतिक वारसा स्थळाला धक्का, 'गझियानटेप' किल्ल्याची पडझड | पुढारी

Turkey : भूकंपामुळे तुर्कस्तानातील जागतिक वारसा स्थळाला धक्का, 'गझियानटेप' किल्ल्याची पडझड

पुढारी ऑनलाईन: तुर्कस्‍तानमध्‍ये झालेल्‍या शक्‍तीशाली भूकंपाचा तडाखा ऐतिहासिक किल्ला आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असलेला ‘गझियानटेप’ ( https://www.castles.nl/gaziantep-castle#gallery995b18d9ba-51 ) याला बसला आहे. या वास्‍तूचे  मोठे नुकसान झाले असल्याची माहिती स्‍थानिक माध्यमांनी दिली आहे.

तुर्कस्‍तान आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (AFAD) दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार आज ( दि. ६ ) पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी  ७.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या शक्‍तीशाली  भूकंपाचे धक्के तूर्कस्तानसह सीरिया, लेबनान, इराक, सायप्रस, ग्रीस, जॉर्डन जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्येही बसले.

भूकंपामुळे गझियानटेप किल्ल्याचे आणि शेजारील वास्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. किल्ल्याच्या शेजारी असलेल्या ऐतिहासिक मशिदीची घुमट आणि पूर्वेकडील भिंत काही प्रमाणात कोसळली आहे.

ऐतिहासिक गझियानटेप किल्ल्याच्या पूर्व, दक्षिण आणि आग्नेय भागातील काही बुरुज भूकंपामुळे नष्ट झाले आहेत.  किल्ल्याभोवतीचे लोखंडी रेलिंग आजूबाजूच्या फुटपाथवर विखुरले आहेत. किल्ल्याला लागून असलेली संरक्षक भिंतही कोसळली आहे. काही बुरुजांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याची माहिती  तुर्कस्‍तानच्‍या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे.

येथील पुरातत्व उत्खन विभागानुसार, गझियानटेप किल्ला हा किल्लेवजा वाडा आहे. रोमन काळातील II-IV शतकात पहिल्यांदा येथे वॉचटॉवर बांधण्यात आले होते. त्यांनंतर काळांतराने या स्थळाचा विकास आणि विस्तार झाला. येथील संग्रहालये आणि पुरातत्व स्थळांचे अधिकृत स्थळानुसार, बायझंटाईन सम्राट जस्टिनियन I च्या काळात मोठया प्रमाणात विकास झाला आहे.

हेही वाचा:

 

 

Back to top button