युद्धात रशियन सैनिकांकडून धनुष्यबाणाचा वापर | पुढारी

युद्धात रशियन सैनिकांकडून धनुष्यबाणाचा वापर

कीव्ह : युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियन सैनिकांकडून धनुष्यबाणाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. ज्यावेळी धनुष्यबाणाचा काहीच उपयोग झाला नाही तर सैनिक बंदुकीचा वापर करत आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ खूपच व्हायरल झाले असून नेटकर्‍यांकडून त्याची खिल्ली उडवली जात आहे. युक्रेनच्या अंतर्ग व्यवहार मंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चकों यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

रशियन सैनिक धनुष्यबाणासह व्हिडीओत दिसत आहे. अँटोन म्हणातात की, हा रशियन सैनिका बशकिरिया शहरातील आहे. त्याच्या बंदुकीसह धनुष्यबाण आहे? हा घोडस्वार आहे काय ? धनुष्यबाणासह असलेल्या या रशियन सैनिकाच्या फोटोला 3 लाख 49 हजारपेक्षा अधिक लोकांनी हा फोटो पाहायला असून तीन हजार लोकांनी लाईक केला आहे. ‘हे बघा रशियाचे अत्याधुनिक लष्कर’ असे एका युझर्सने लिहिले असून मला वाटते रशियन सैनिकाला बहुधा तिरंदाजीत सर्वाधिक रूची असल्याचे दुसर्‍या एका युझर्सने म्हटले आहे.

Back to top button