‘लिओनेल-लिओनेला’ कुर्रर्रsss… डिसेंबरमध्ये जन्मलेल्या ७० बालकांचं ‘मेस्सी’च्या नावानं बारसं | Messi Mania | पुढारी

‘लिओनेल-लिओनेला’ कुर्रर्रsss... डिसेंबरमध्ये जन्मलेल्या ७० बालकांचं ‘मेस्सी’च्या नावानं बारसं | Messi Mania

साल्टा (अर्जेटिना); पुढारी ऑनलाईन : साऊथ अमेरिकातील देशांसाठी फुटबॉल हा फक्त एक खेळ नाही तर तो त्यांच्यासाठी त्याहून अधिक किंवा सर्वकाही आहे. फुटबॉल हा त्यांच्यासाठी एखाद्या देवाची उपासना करण्यासारखा आहे आणि हेच उत्तर अमेरिका खंडातील ब्राझिल, अर्जेटिना आणि अशा देशांना पाहिले की लक्षात येते. (Messi Mania)

१८ डिसेंबर २०२२ रोजी अर्जेटिनाने फिफा फूटबॉल विश्वचषक जिंकला आणि अर्जेटिनाच्या रस्त्या रस्त्यावर, चौका- चौकात दिसेल त्या ठिकाणी एकच जल्लोष, उत्साह अन् उत्सव साजरा केला जावू लागला. ३६ वर्षांपासून ज्याची प्रतिक्षा होती त्या विश्वचषकाला अर्जेटिना पुन्हा एकदा गवसणी घालू शकला. फूटबॉलचा जादूई खेळाडून जो अर्जेटिनांच्या प्रत्येकांच्या ह्रदया जवळ आहे, अशा लिओनेल मेस्सी यांच्या नेतृत्त्वाखाली अर्जेटिनाना पुन्हा एकदा फुटबॉलमध्ये जगजेत्ता ठरला. म्हणूनच या फुटबॉलच्या धर्माचा देवच जणू लिओनेल मेस्सी अर्जेटिनासाठी ठरत आहे. सध्या फक्त मेस्सी मेस्सी या नामाचा गजरच एकप्रकारे अर्जेटिनामध्ये सुरु आहे. (Messi Mania)

मेस्सीची क्रेझ, जादू काय आहे ती या एका घटनेने समोर येते. एक अशी माहिती समोर आली की डिसेंबरमध्ये जन्मलेल्या ७० बालकांची नावे ही फुटबॉलपटूंवरुन ठेवण्यात आली आहेत. शिवाय यात काहीच शंका नाही यातील अधिक नावे ही फक्त लिओनेल किंवा लिओनेला अशी ठेवण्यात आली आहेत. (Messi Mania)

सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या ६ मुलांची नावे अशी ठेवण्यात आली. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमध्ये ३२ मुलांची नावे या पद्धतीने ठेवण्यात आली. यानंतर डिसेंबरमध्ये यामध्ये आणखीनच भर पडली.

सांता फेच्या सिव्हिल रजिस्ट्रीचे संचालक मारियानो गाल्वेझ यांनी रेडिओ सांता फे LT9 ला सांगितले की मेस्सी व्यतिरिक्त, ज्युलियन अल्वारेझ आणि गोलकीपर एमिलियानो मार्टिनेझ सारखे त्यांचे इतर सहकाऱ्यांनी सुद्धा लक्षणीय लोकप्रियता मिळवत आहे आणि त्यांची नावे देखील अनेक वेळा मुलांना देण्यात आली आहेत.

अधिक वाचा :

Back to top button