युद्धग्रस्त युक्रेनमधून परतण्यास भारतीय विद्यार्थ्यांचा ठाम नकार | पुढारी

युद्धग्रस्त युक्रेनमधून परतण्यास भारतीय विद्यार्थ्यांचा ठाम नकार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या सुमारे 1500 भारतीय विद्यार्थ्यांनी तेथून मायदेशी यायला नकार दिला आहे. आम्ही येथेच शिकू किंवा मरण पत्करू, असा निर्धार या विद्यार्थ्यांनी केला आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून रशिया- युक्रेन संघर्ष सुरू असून त्यात शेकडो लोक ठार झाले आहेत. अजूनही हे युद्ध संपण्याची शक्यता द़ृष्टिपथात आलेली नाही. अशावेळी युद्धजन्य वातावरणात राहणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण. मात्र, या विद्यार्थ्यांना आता मरणाचेही भय वाटत नाही, असे दिसू लागले आहे.

वास्तविक केंद्र सरकारने यापूर्वीच युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. युद्ध सुरू असेपर्यंतच्या काळात या विद्यार्थ्यांनी तातडीने मायदेशी परतावे, असा फतवा केंद्र सरकारने जारी केला आहे. नोकरी किंवा अन्य कारणांमुळे युक्रेनमध्ये आलेल्या अन्य भारतीयांनी युद्ध सुरूच होताच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. सरकारनेही त्यांना
याकामी मदत केली. या विद्यार्थ्यांचे म्हणणे असे की, सरकारने त्यांच्या शिक्षणाची कोणतीही सोय मायदेशी केलेली नाही. हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहेत.

Back to top button