Sewing machine: ‘या’ व्यक्तीने आजच्याच दिवशी दिले होते जगाला पहिले शिवणयंत्र | पुढारी

Sewing machine: 'या' व्यक्तीने आजच्याच दिवशी दिले होते जगाला पहिले शिवणयंत्र

पुढारी ऑनलाईन: अमेरिकन संशोधक इलियास होवे यांनी जगातील पहिल्या शिवणयंत्राचा शोध लावला. १० सप्टेंबर १८४६ मध्ये त्यांना शिवण यंत्राचे पहिले पेटंट मिळाले. विचार केला तर असे लक्षात येईल की, जर हॉवेने शिलाई मशीनचा शोधच लावला नसता, तर आपण इतके सुंदर आणि फॅशनेबल कपडे कधी घालूच शकलो नसतो. जाणून घेऊया कोण आहे ही व्यक्ती ज्याने शिवणयंत्र बनवले.

इलियास होवे यांचा जन्म ९ जुलै १८१९ रोजी झाला. १८३५ साली त्यांनी अमेरिकेतील एका कापड कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. शिवण यंत्राचा शोध लावणाऱ्या इलियास होवे याने शिवणयंत्र बनवले खरे, पण जेव्हा तो ते चालवायचा प्रयत्न करायचा तेव्हा याचा धागा पुन्हा पुन्हा तुटायचा. त्यानंतर इलियासने मशिनची बारकाईने तपासणी केली. तेव्हा त्याला कळले, की बाकी सर्व काही ठीक आहे, फक्त सुईमुळेच हा धागा तुटला जातोय, त्यानंतर त्यांने प्रयत्न करून सुई आणि धागा यांचाही मेळ घातला.

१८४६ मध्ये, त्यांना शिवणयंत्रातील लॉकस्टिच डिझाइनसाठी पहिला यूएस पेटंट पुरस्कार मिळाला. पण अमेरिकेतील एकही व्यक्ती हे यंत्र घेण्यास तयार नव्हता. त्यानंतर होवेचा भाऊ ब्रिटनला गेला आणि हे शिवणयंत्र त्याने £250 पाऊंडला विकला. त्यानंतर १८५१ मध्ये त्यांने जिपरचा शोध लावला आणि त्याचे पेटंट देखील घेतले.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतात शिलाई मशिन दाखल

शिलाई मशिन

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस भारतातही शिवणयंत्र आले. उषा नावाचे पहिले शिलाई मशीन भारतात कोलकाता (कलकत्ता) येथील कारखान्यात १९३५ मध्ये बनवले गेले. या शिवणयंत्राचे सर्व भाग देखील भारतातच बनवले गेले. इलियास होवे यांच्या स्वप्नामुळेच या शिलाई मशीनचा शोध लागला असे म्हटले जाते.

हेही वाचा:

Back to top button