Aaron Finch | ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ॲरॉन फिंचची वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Aaron Finch | ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ॲरॉन फिंचची वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
Published on
Updated on

मेलबर्न: ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ॲरॉन फिंचने (Australia captain Aaron Finch) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळेल. अॅरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाकडून १४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात फिंचने, "काही अविश्वसनीय आठवणींसह हा एक विलक्षण प्रवास होता." असे म्हटले आहे.

"आता नवीन नेतृत्वाला पुढील विश्वचषकाची तयारी करण्याची आणि तो जिंकण्याची सर्वोत्तम संधी देण्याची वेळ आली आहे. माझ्या या प्रवासात ज्यांनी मला मदत केली आणि पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो," अशा भावना फिंचने व्यक्त केल्या आहेत. फिंच ICC क्रिकेट विश्वचषक २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघात खेळणार नसला तरी तो या वर्षीच्या T20 विश्वचषकात संघाचे नेतृत्व करणार आहे.
१७ शतकांसह ५४०० हून अधिक धावा त्याच्या नावावर आहेत. त्याने २०१३ मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. त्याने स्कॉटलंडविरुद्ध १४८ धावा करत पहिले शतक झळकावले होते.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (Cricket Australia) सीईओ निक हॉकले यांनी म्हटले आहे की "ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून आणि ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये ॲरॉनचे मोठे योगदान असून त्याबद्दल त्याचे अभिनंदन. Aaron Finch हा एक विशेष प्रतिभाशाली आणि दृढनिश्चयी खेळाडू आहे. आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा त्याचा निर्णय हा खेळाकडे त्याच्या निस्वार्थ दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news