द लॉर्ड ऑफ द रिंग्ज : द रिंग्ज ऑफ पॉवर – ‘ही’ वेबसीरिज ठरली सर्वाधिक लोकप्रिय

द लॉर्ड ऑफ द रिंग्ज : द रिंग्ज ऑफ पॉवर – ‘ही’ वेबसीरिज ठरली सर्वाधिक लोकप्रिय

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेखक जे. आर. आर. टॉल्किन यांच्या 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या क्लासिक फँटसी नॉव्हेल सीरिजचे जगभरात चाहते आहेत. या सीरिजची पुस्तके गाजली आणि यावरील चित्रपटही गाजले. किंबहुना, कथा, आवाका, भव्यता यामुळे या कलाकृतींनी अनेक विक्रम आपल्या नावे केले. आता यावर एक महागडी सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने बनवली आहे. ही सीरिज आयएमडीबीवर सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे.

'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज ः द रिंग्ज ऑफ पॉवर' असे या सीरिजचे नाव असून सीरिजचे बजेटच 8000 कोटींहून अधिक आहे. ही सीरिज 2 सप्टेंबरपासून स्ट्रीम झाली आहे. ही सीरिज समीक्षकांना तितकीशी आवडली नसली, तरी प्रेक्षकांना मात्र ही सीरिज खूप आवडत आहे. कारण, यामुळे अ‍ॅमेझॉन प्राईमची व्ह्यूवरशीप वाढली आहे. या आकडेवारीने सर्वांनाच धक्‍का दिला आहे.

ही सीरिज जगभरातील 2.5 कोटी दर्शकांनी पाहिली आहे. तसेच 'आयएमडीबी'च्या यादीत ही वेबसीरिज सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. 240 देशांमध्ये विविध भाषांमध्ये ही सीरिज रीलिज करण्यात आली आहे. भारतातच ही सीरिज हिंदी, इंग्रजीसह तामीळ, तेलगू, कन्‍नड आणि मल्याळम भाषेत रीलिज झाली आहे. आतापर्यंत सीरिजचे दोनच एपिसोड रीलिज झाले आहेत. दर आठवड्याला एक एपिसोड रीलिज केला जात आहे. ही सीरिज म्हणजे 'द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'या चित्रपटाची प्रीक्‍वेल सीरिज आहे.

आयएमडीबीनुसार सर्वाधिक लोकप्रिय दहा वेबसीरिज 

सीरिजचे नाव                                       ओटीटी प्लॅटफॉर्म
1. द लॉर्ड ऑफ द रिंग्ज- द रिंग्ज ऑफ पॉवर अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ
2. स्ट्रेंजर थिंग्स सीजन 4 नेटफ्लिक्स
3.अंब्रेला अ‍ॅकॅडमी नेटफ्लिक्स
4. द विचर नेटफ्लिक्स
5. द क्राऊन नेटफ्लिक्स
6. हार्ले क्‍विन एचबीओ मॅक्स
7. मनी हाईस्ट नेटफ्लिक्स
8. कोबरा काय नेटफ्लिक्स
9. सेक्स एज्युकेशन नेटफ्लिक्स
10. द मेंडेलोरियन डिज्नी + हॉटस्टार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news