चिमणीने चोरलेल्या कॅमेरात सापडला ‘हा’ व्हिडिओ | पुढारी

चिमणीने चोरलेल्या कॅमेरात सापडला 'हा' व्हिडिओ

नवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन

चिमण्यांचा क्लोजप फोटो घेणे एका फोटोग्राफरला चांगलेच महागात पडले. नॉर्वेत राहणाऱ्या रॉबर्टसनच्या बरोबर एक मजेशीर घटना घडली. चिमण्यांचा क्लोजप फोटो घेण्यासाठी त्याने अंगणात ब्रेडचे तुकडे टाकले होते. मात्र, एका चिमणीला खूपच भूक लागली होती. तिने ब्रेडचे तुकडे खाऊन जवळच असलेला कॅमेराही खाण्याचा प्रयत्न केला. पण कॅमेरा खाता येत नसल्याने चिमणीने तो तोंडात घेऊन ती घेऊन गेली.

५ महिन्यांनी ज्यावेळी हा कॅमेरा रॉबर्टसनला सापडला तेव्हा त्याच्या हाती एक धक्कादायक व्हिडीओ लागला. चिमणी ज्यावेळी हा कॅमेरा घेऊन उडून गेली होती. त्यावेळी अनावधानाने त्याचे व्हिडिओ शुटींग झाले होते. सध्या चिमणीचा हा ड्रोन व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

Back to top button