इराणमध्ये हिंसक निदर्शने;१२ ठार | पुढारी | पुढारी

इराणमध्ये हिंसक निदर्शने;१२ ठार | पुढारी

तेहरान : वृत्तसंस्था

इराण सरकारच्या फसलेल्या आर्थिक धोरणाविरोधात हिंसक निदर्शने केली जात आहेत. यामध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 12 जण ठार झाले असल्याचे वृत्त इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिले आहे. राष्ट्राध्यक्ष हासन रुहानी यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

इराणमध्ये 2009 नंतर ही सर्वात मोठी निदर्शने मानली जात आहेत. सशस्त्र निदर्शकांनी पोलिस ठाणे ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 10 जण ठार झाले. तसेच इझेह येथेही पोलिसांच्या गोळीबारात 2 जण ठार झाले आहेत. 

राष्ट्राध्यक्ष हासन रुहानी यांनी  लोकांना त्यांची मते व टीकाटिपणी मांडण्याची पूर्ण मुभा असल्याचे सांगितले. टीका करणे व हिंसाचार करीत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यात फरक आहे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्‍त केली आहे. 

Back to top button