पाकच्या आर्थिक नाड्या आवळल्या | पुढारी | पुढारी

पाकच्या आर्थिक नाड्या आवळल्या | पुढारी

वॉशिंग्टन :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षाच्या दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानला दणका दिला. अमेरिकेने पाकिस्तानची 255 दशलक्ष डॉलरची (सुमारे 1600 कोटी) लष्करी मदत रोखली असून दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या सहकार्यावरच आर्थिक मदतीचे भवितव्य अवलंबून आहे, असे अमेरिकेने पाकला ठणकावले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववर्षात केलेल्या पहिल्याच ट्विटमध्ये पाकवर आगपाखड केली होती. अमेरिकेने दिलेल्या अब्जावधी डॉलरच्या मदतीच्या मोबदल्यात पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देऊन अमेरिकेची फसवणूक केली. अमेरिकी नेत्यांनी आजवर आपली गणना मूर्खात करून घेतली. मात्र आता पुरे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी पाकला ठणकावले होते. गेल्या 15 वर्षांत अमेरिकेने पाकला 33 अब्ज डॉलरची मदत केली. मात्र, त्या बदल्यात पाकने आम्हाला केवळ भूलथापा दिल्या, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. ट्रम्प यांनी पाकला सुनावल्याने अमेरिकेकडून पाकला दिली जाणारी आर्थिक मदत थांबवली जाईल, असे संकेत मिळाले होते.

Back to top button