श्रीदेवीची अकाली एक्झिट, बॉलिवूडवर शोककळा | पुढारी

श्रीदेवीची अकाली एक्झिट, बॉलिवूडवर शोककळा

दुबई: पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडची हवा हवाई गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांचे दुबईमध्ये शनिवारी मध्यरात्री अकस्मात निधन झाले. श्रीदेवी यांच्या अकाली झालेल्या या धक्कादायक निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ह्रद्यविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यु झाला. दुबईमध्ये एका नातेवाईकाच्या लग्नामध्ये सामील होण्यासाठी गेलेल्या श्रीदेवींची प्राणज्योत मालवल्याने त्यांच्या फॅनना मोठा धक्का बसला आहे. मृत्युसमयी त्यांच्यासोबत त्यांचे पती बोनी कपूर, लहान मुलगी खुशी होती तर मोठी मुलगी जान्हवी चित्रिकरणानिमित्त मुंबईत होती. वयाच्या अवघ्या चौपन्नव्या वर्षी झालेल्या या निधनाने त्यांच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. श्रीदेवी त्यांचे पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या लग्नसमारंभासाठी दुबईला गेल्या होत्या. लग्न समारंभात असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले व हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यामध्येच त्यांचे निधन झाले. 

‘त्याचे’ प्रेम पाहून श्रीदेवी म्हणाली, ‘मी स्वत:ला धन्य समजते’

श्री अम्मा यंगर अय्यपन हे मुळ नाव असलेल्या श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये आपला स्वतंत्र व प्रभावशाली वेगळा ठसा उमटवला होता. श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटात दमदार अभिनय केल्यानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी ‘थुनैवन’ या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1971 मध्ये  वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांना ‘पुम्बाता’ या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 1978 मध्ये ‘सोलहवा सावन’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी  बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘सदमा’, ‘नागिन’, ‘निगाहें’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चालबाज’, ‘लम्हे’, ‘खुदा गवाह’, ‘जुदाई’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी झालेल्या  विवाहानंतर काही काळ त्यांनी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. 

ब्लॉग : हा ‘सदमा’ कसा सहन करायचा?

2012 मध्ये श्रीदेवीने ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातून कमबॅक केले होते. सुमारे तीनशे चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. 90च्या दशकात त्यांनी आपल्या अदाकारीने अनेकांना घायाळ केले. अनेक सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमांतून श्रीदेवी यांनी कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तामिळनाडूच्या मीनमपट्टी या छोट्याशा गावात राहणार्याय श्रीदेवीने बाल कलाकार म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केला व दर्जेदार चित्रपट देऊन आपल्या कारकिर्दीचा आलेख सातत्याने उंचावत नेला. नुकताच त्यांचा ‘मॉम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

Viral: हवाहवाईचा अखेरचा व्हिडिओ

‘धडक’ या चित्रपटातून त्यांची मुलगी जान्हवी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यासाठी श्रीदेवी प्रमोशनचे काम करत होत्या मात्र मुलीचे बॉलीवूड पदार्पण होण्यापूर्वीच त्यांचे अकाली निधन झाले.  वयाच्या तेराव्या वर्षी ‘मूंद्रू मुदिचू’  हा श्रीदेवींनी केलेला तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला सिनेमा मानला जातो. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला ‘सोलवा सावन’ हा  श्रीदेवी  यांचा पहिला बॉलिवूडपट ठरला. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मतवाला’ चित्रपटाने त्यांच्या नावाचा मोठा गवगवा झाला.  जीतेंद्र आणि श्रीदेवी या जोडीने  त्यानंतर ‘मवाली’, ‘मकसद’, ‘जस्टिस चौधरी’ असे एकापाठोपाठ हिट चित्रपट दिले. ‘सदमा’ या कमल हसन सोबतच्या चित्रपटात केलेल्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली.

…आणि आईची इच्छा अपूर्णच राहिली

‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘मिस्टर इंडिया’, ‘खुदा गवाह’, ‘नगिना’, ‘चालबाज’ यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले. अनिल कपूर सोबत केलेल्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटात केलेल्या नृत्याने त्यांना ‘मिस हवाहवाई’ हे टोपणनाव मिळाले. 

श्रीदेवीच्या एक्‍झिटने राजकीय क्षेत्रातही हळहळ

श्रीदेवी यांनी मिथुन चक्रवर्तीशी 1985 मध्ये पहिला विवाह केला होत मात्र हा  विवाह अवघी तीन वर्षे टिकला. त्या दोघांनी 1988 मध्ये  घटस्फोट घेतला.   त्यानंतर श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्यात जवळीक निर्माण झाली. 1991 मध्ये त्या दोघांनी लग्न केलं. हे बोनी यांचे दुसरे लग्न होते. 1997 मध्ये केलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी जवळपास पंधरा वर्षांचा मोठा ब्रेक घेतला. 2017 मध्ये  प्रदर्शित झालेला ‘मॉम’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. ‘मॉम’ हा त्यांचा तीनशेवा चित्रपट होता. 

कोणाच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या?

सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. गेल्या वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला पन्नास  वर्षे पूर्ण झाली. 

सध्या त्या शाहरुख खानच्या आगामी ‘झिरो’ चित्रपटाचे शूटिंग करत होत्या.  श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी करण जोहर दिग्दर्शित ‘धडक’ चित्रपटातून पदार्पण करणार होती. मात्र तिचा  पहिला चित्रपट पाहण्यापूर्वीच त्यांनी जगाचा  निरोप घेतला.

श्रीदेवीच्या सौंदर्याचे रहस्‍य 

गंभीर, विनोदी अनेक चित्रपटांमधील  त्यांच्या अनेक संवेदनशील भूमिका गाजल्या. नृत्यांगना म्हणून त्यांनी चाहत्यांच्या मनावर आपला  ठसा उमटवला होता. 

श्रीदेवी यांची कारकीर्द

> श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलो  जाते. 1968 मध्ये  वयाच्या चौथ्या वर्षी ‘थुनैवन’ या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात

> 1971 मध्ये वयाच्या आठव्या वर्षी ‘पुम्बाता’ या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार

> 1975 मध्ये  वयाच्या  बाराव्या व्या वर्षी ‘ज्युली’ या बॉलिवूडपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण.

> 1976 मध्ये  वयाच्या तेराव्या  वर्षी ‘मूंद्रू मुदिचू’ हा तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला चित्रपट मानला जातो.

> 1978 मध्ये  वयाच्या पंधराव्या   वर्षी ‘सोलवा सावन हा पहिला बॉलिवूडपट

गाजलेले चित्रपट-

1983- सदमा, 1983- हिम्मतवाला,1983- जस्टिस चौधरी, 1983- मवाली, 1983- कलाकार,1984- तोहफा, 1986- नगिना, 1986- आग और शोला, 1986- कर्मा, 1986- सुहागन, 1987 – औलाद, 1987 – मिस्टर इंडिया, 1989 – निगाहे (नगिना भाग 2), 1989 – चांदनी, 1989 – चालबाज (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर), 1991 – फरिश्ते, 1991 – लम्हे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर), 1992 – खुदा गवाह, 1992 – हीर रांझा, 1993 – रुप की रानी चोरों का राजा, 1993 – गुमराह, 1993 – चंद्रमुखी, 1994 – लाडला, 1997 – जुदाई, 2004 – सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री, 2012 – इंग्लिश विंग्लिश, 2017 – मॉम

Back to top button