जगभरात विखुरलंय दाऊदच्या डी कंपनीचं जाळं : अमेरिका | पुढारी

जगभरात विखुरलंय दाऊदच्या डी कंपनीचं जाळं : अमेरिका

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीने जगभरातील अनेक देशात आपला अवैध धंदा पसरवल्याचा दावा अमेरिकेतील एका प्राध्यापकाने केला आहे. जॉर्ज मॅसन यूनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डॉ. लुईस शेली यांनी अमेरिकेन संसदेच्या सदस्यांना याप्रकरणी माहिती दिली. पाकिस्तानस्थित डी कंपनीने मादक पदार्थांचा कारभार इतर देशातही पसरवला आहे. डी कंपनीच्या अवैध कारभाराचे जाळे जगभरात  पसरले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  

शेली यांनी दावा केला आहे की, डी कंपनीचे अधिक व्यापक पद्धतीने अनेक देशात कार्यरत आहे. दहशतवाद आणि अवैध पैसा पुरवठा यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या वित्तीय सेवा संबंधीत समितीच्या सुनावणीवेळी अमेरिकेच्या संसदेत त्यांनी ही माहिती दिली. मॅक्सिकोतील अवैध व्यवसायाप्रमाणे डी कंपनीने देखील अनेक देशात आपला विस्तार केला आहे. शस्त्रास्त्र, बनावट डीव्हीडी यांच्या तस्करीतून डी कंपनी पैसा उभारत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

अमेरिकेने २०१३ मध्ये दाऊद विरोधातील भारताने  केलेले आरोप मान्य केले होते. त्यानंतर यूएस ट्रेजरी विभागाने  दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. दाऊदवर संयुक्त संघानेही निर्बंध घातले आहेत. दाऊदला पाकिस्तान आश्रय देत असल्याच्या भारताच्या दाव्याचेही अमेरिकेने समर्थन केले आहे. दाऊदकडे पाकिस्तानचा पासपोर्ट असून तो कराचीमध्ये वास्तव्यास असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

Tag :  Pakistan, Dawood Ibrahim,  D Company, India, American Professor, America, , Terrorism In World

Back to top button