फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला, 2 ठार अन्य बंधक | पुढारी

फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ला, 2 ठार अन्य बंधक

तुलूझ: पुढारी ऑनलाईन

दक्षिण फ्रान्समधील तुलूझ शहरात एका सुपरमार्केटमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी काही नागरिकांना बंधक बनवले आहे. हा दहशतवादी हल्ला असून यामागे इस्लामिक स्टेट ही संघटना असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तुलूझ शहरातील सुपर यु स्टोर प्रथम गोळाबाराचा आवाज आला. त्यानंतर मार्केटमध्ये असलेल्या लोकांना बंधक बनवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, फ्रान्सच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. नागरिकांनी पुढील सुचना मिळेपर्यंत या परिसरात जाऊ नये. 

2015पासून फ्रान्स दहशतवाद्यांच्या रडारावर आहे. नोव्हेंबर 2015मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 130 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी जानेवारीत चार्ली हेब्डो या मासिकाच्या कार्यालयात झालेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले होते. तर जुलै 2016मध्ये आयएसने केलेल्या हल्ल्यात 84 जण ठार झाले होते. 

Tags : France, Shooting, hostage, Trebes

Back to top button