तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर मलाला ६ वर्षांनंतर मायदेशी | पुढारी

तालिबान्यांच्या हल्ल्यानंतर मलाला ६ वर्षांनंतर मायदेशी

 नवी दिल्ली : 

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझई एका खास कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवारी पाकिस्तानात परतली आहे. २०१२ मध्ये अवघ्या १५ व्या वर्षी तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हा तिचा पहिला मायदेशी दौरा आहे. या दौऱ्यात मलाला पाकिस्तानी  पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी, लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासह इतरही विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेणार आहे. 

मुस्लीम मुंलीच्या शिक्षणामध्ये पुढाकार घेतल्यामुळे मलालावर २०१२ मध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी गोळी झाडली होती. या हल्ल्यानंतर मलालाने पाकिस्तान सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक झाली. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी मलाला युसुफजई कडेकोट सुरक्षेसह पाकिस्तानात दाखल झाल्याचे वृत्त दिले आहे. इस्लामाबादच्या   बेनझीर भुट्टो अंतरराष्ट्रीय विमानतळावरील फोटोच्या आधारावर प्रसारमाध्यमांनी ही माहिती दिली.  

आक्टोबर २०१२ मध्ये  खैबर पख्तूनख्वा प्रांतांत स्कूल बसमधून शाळेत जात असताना बस थांबवून तालिबान्यांनी नाव विचारत तिच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी डोक्याला चाटून गेल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. पाकिस्तानातील प्राथमिक उपचारानंतर तिला इंग्लंडमधील लंडनमध्ये हलवण्यात आले. या घटनेचा देशभरातून निषेध नोंदवण्यात आला होता. यानंतरही न डगमगता तिने मुस्लीम मुलींच्या शिक्षणासाठी त्याच उमेदीने काम केले. तिच्या या अतुलनिय कामाबद्दल २०१४ मध्ये  मलालाला  शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

Tags : Nobel Peace Laureate.  Malala Yousafzai, Pakistan, Talibani Attack

Back to top button