अर्जुन रणतुंगाला गोळीबार प्रकरणी अटक  | पुढारी

अर्जुन रणतुंगाला गोळीबार प्रकरणी अटक 

कोलंबो : पुढारी ऑनलाईन 

श्रीलंकेला १९९६ चा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार अर्जुन रणतुंगाला श्रीलंकन पोलिसांनी अटक केली आहे. रणतुंगाने केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कोलंबो पलिसांनी या प्रकरणी रणतुंगांना लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येईल असे सांगितले आहे. 

लंकेचा माजी कर्णधार आणि आधीच्या सरकारमध्ये खनिजतेल मंत्री असलेल्या रणतुंगाच्या सुरक्षा रक्षाकाने विकेंडला गोळीबार केला. या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. श्रीलंकेतील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी पंतप्रधान माजी पंतप्रधान विक्रमसिंगे यांना पदावरुन हटवल्यानंतर नवनिर्वाचित पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली आहे. त्यांनी जुन्या सर्व मत्र्यांना त्यांच्या कार्यालयात येण्यापासून रोखले आहे. 

अर्जुन रणतुंगा यांनी त्यांच्या मत्रालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तेथे झालेल्या वादात रणतुंगाच्या सुरक्षा रक्षाकाने गोळबार केला होता. त्यात एकचा मृत्यू झाला होता. 

 

Back to top button