चीनमधील केमिकल प्लांटमध्ये स्फोट; २२ ठार | पुढारी

चीनमधील केमिकल प्लांटमध्ये स्फोट; २२ ठार

हेबेई (चीन) : पुढारी ऑनलाईन

चीनमधील उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजीकौ शहरातील एका केमिकल प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २२ जण जखमी झाले आहेत.

या स्फोटाची झळ वाहनांना बसली आहे. यामुळे ५० वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत, अशी माहिती सरकारी वृत्त एजन्सीने दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. केमिकलचा स्फोट झाल्यानंतर प्लांटमधील ३८ ट्रक आणि १२ कारगाड्यांना आग लागली आहे. या ठिकाणी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

याआधी २०१५ मध्ये बिजिंगच्या पूर्वेला असलेल्या तियानजीन येथे झालेल्या स्फोटात १७३ जणांचा मृत्यू झाला होता.

  

Back to top button