बेंजामिन नेतान्याहू यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण …  | पुढारी

बेंजामिन नेतान्याहू यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण ... 

तेल अवीव : पुढारी ऑनलाईन 

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची कोरोना विषाणूची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याआधी सोमवारी नेतन्याहू यांच्या संसदीय सल्लागाराला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. आता नेतान्याहू यांची टेस्ट नेगेटिव्ह आली असली तरी त्यांना १४ दिवस सेल्फ क्वॉरटाईन राहावं लागणार आहे. 

बेंजामिन नेतन्याहू यांची सल्लागार रिवका पलूचला कोरोनाचे संक्रमण झाले होते. रिपोर्टनुसार, तीन दिवस आधी ती  नेतान्याहू यांना भेटली होती. पलूचने गेल्या आठवड्यात संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावली होती. त्यावेळी नेतान्याहू तसेच विरोधी पक्षातील सदस्य उपस्थित होते. त्यानंतर, १५ मार्चला खबरदारी म्हणून नेतान्याहूची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यावेळी रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. आता पलूचची प्रकृती चांगली आहे, असे इस्त्रायली माध्यमांनी स्पष्ट केले आहे.

इस्त्रायलमध्ये कोरोनाचे ४ हजार ३४७ रुग्ण 

इस्त्रायलमध्ये कोरोनाचे ४ हजार ३४७ रुग्ण असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३४ जण बरे झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी आपत्कालीन सरकार बनवण्याचा इस्त्रायल सरकारचा प्रयत्न आहे. 

१५ जणांचा मृत्यू 

रिपोर्टनुसार, इस्रायलमध्ये कोरोना विषाणूने बाधित ४ हजार २४७ प्रकरणे समोर आली आहेत. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात कोरोनाने तब्बल ३५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 

स्टाफ आणि कुटुंबियांची नेगेटिव्ह टेस्ट 

खबरदारी म्हणून नेतान्याही यांचा ऑफिस स्टाफ आणि कुटुंबीयांचीही कोरोना विषाणूची टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. 

Back to top button