म्यानमारमध्ये भुस्खलन होऊन १६० मृत्यूमुखी | पुढारी

म्यानमारमध्ये भुस्खलन होऊन १६० मृत्यूमुखी

पुढारी  ऑनलाईन

उत्तरी म्यानमारमधील जाडे खाणीमध्ये भुस्खलन होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत तब्बल १६२ मृत्यूमुखी पडले आहेत.  दुर्घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरु आहे. ही घटना काचीन राज्यातील हपकानत भागात ही घटना घडली आहेत. अजूनही या परिसरातून अनेकजण बेपत्ता असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

मुसळधार पावसाने राडारोडा आणि दगड खाणीत एखाद्या लाटेप्रमाणे कोसळल्याने जिवितहानी मोठ्या प्रमाणात झाली. घटना घडली त्यावेळी अनेकजण त्या ठिकाणी काम करत होते. म्यानमारमध्ये जगातील सर्वांधिक जेड दगड म्हणजेच हरिताश्म (हिरव्या रंगाचे) किमती रत्न सापडतात. म्यानमारमध्ये जवळपास ३० अब्ज डाॅलरचा व्यवसाय होतो. 

 

Back to top button