अमेरिकेत स्वातंत्रदिनच्या उत्सवावर कोरोनाचे सावट! | पुढारी

अमेरिकेत स्वातंत्रदिनच्या उत्सवावर कोरोनाचे सावट!

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

फ्लोरिडासह अमेरिकेच्या बर्‍याच भागात कोरोना विषाणूच्या संसर्गाची मोठ्या प्रमाणात प्रकरणे नोंदली गेली आहेत. ज्यामुळे देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या उत्साहावर दु:खचे सावट दाटलेले आहे. देशातील ५० राज्यात संसर्ग होण्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत शुक्रवारी ५४ हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले. जी एका दिवसात सर्वाधिक नोंदवली गेलेली संख्या आहे, तर शनिवारी ही संख्या ५० हजाराहून अधिक होती. 

जगभरातीत एक चतुर्थांश रुग्ण एकट्या अमेरिकेत…

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत कोविड १९ ची एकूण २८ लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या संपूर्ण जगात एक चतुर्थांश आहे. रुग्णांमध्ये संसर्गाची चिन्हे दिसत नसल्याने आणि तपासणीची संख्या कमी झाल्यामुळे या संसर्गाशी संबंधित अचूक माहिती समोर येत नाही.

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे १ लाख २८ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या १.७ कोटीच्या पुढे गेली आहे. तर ५ लाख १७ हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

शनिवारी फ्लोरिडामध्ये कोविड १९ च्या ११ हजार  ४४५ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर राज्यात संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९० हजार पेक्षा जास्त झाली आहे.

स्वातंत्र्यदिन उत्सव विस्कळीत…

अमेरिका आपला २४४ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. अमेरिकेत कोविड १९ च्या वाढत्या रुग्णांमुळे ४ जुलैला साजरा होणा-या स्वातंत्र्यदिनाचा उत्सव फिका पडला. रविवारी संध्याकाळी व्हाईट हाऊस साऊथ लॉन येथे होणा-या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाच्या कार्यक्रमात तसेच वॉशिंग्टनमध्ये होणा-या फटाक्यांच्या आतसबाजीत नागरिकांना सहभाग घता येणार नाही.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेच्या २४४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या तिथल्या नागरिकांना शुभेच्छा देतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण स्वातंत्र्य आणि मानवी उपक्रमांना नेहमीच महत्त्व देता, या मूल्यांची आम्ही कदर करतो, अशा भावना पीएम मोदींनी व्यक्त केल्या आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विटरवर पीएम मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदींच्या अभिनंदन संदेशाला उत्तर दिले आहे. ‘धन्यवाद माझ्या मित्रा. अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे!, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Back to top button