न्यूझीलंड पोलिसांचा भर रस्त्यावर पंजाबी भांगडा; पाहण्यासाठी गर्दी उसळली! (video) | पुढारी

न्यूझीलंड पोलिसांचा भर रस्त्यावर पंजाबी भांगडा; पाहण्यासाठी गर्दी उसळली! (video)

ऑकलंड : पुढारी ऑनलाईन 

पंजाबची प्रसिद्ध अभिनेत्री नीरू बाजवाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओने चांगलेच लक्ष वेधले आहे. नीरू बाजवाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे कोणाचेही हृदय आनंदित होईल. नीरू बाजवाने ऑकलंडच्या रस्त्यावरील न्यूझीलंड पोलिस भांगडा करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते जबरदस्त स्टाईलमध्ये थरथरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना माझा दिवस बनवल्याचे नीरु बाजवाने म्हटले आहे. 

नीरू बाजवाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ ९४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. चाहतेदेखील या व्हिडिओवर भाष्य करण्यास कंटाळलेले नाहीत. व्हिडिओ शेअर करताना, तिने लिहिले की, याने माझा दिवस बनवला. व्हिडिओमध्ये न्यूझीलंडचे पोलिस भांगडा नीरू बाजवा आणि दिलजित दोसांझ यांच्या चित्रपटातील ‘शदा’ या गाण्यावर जबरदस्त स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. त्यांचे नृत्य पाहण्यासाठी रस्त्यावरही बरीच गर्दी पाहायला मिळते. हा व्हिडिओ 2019 च्या दिवाळी सेलिब्रेशनशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

नीरू बाजवाच्या या व्हिडिओमध्ये न्यूझीलंड पोलिस भांगडाची नृत्य आणि शैली खरोखर पाहण्यासारखी आहे. त्यांच्या नृत्याचे कौतुक करताना सोशल मीडिया यूझर्स थकलेले नाहीत. 

Back to top button