गोव्यातील कळंगुटमध्ये शिवरायांचा पुतळा हटविण्यावरून तणाव | पुढारी

गोव्यातील कळंगुटमध्ये शिवरायांचा पुतळा हटविण्यावरून तणाव

म्हापसा: पुढारी वृत्तसेवा : कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पंचायतीने हटविण्याचे आदेश दिले होते. यामुळे कळंगुट येथे आज (दि.२०)  वातावरण तणावपूर्ण झाले होते. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

आज सकाळपासून कळंगुट येथे शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने गर्दी करून पंचायतीच्या या आदेशाला विरोध दर्शवित निदर्शने केली.
यावेळी जमलेल्या शिवप्रेमींनी छत्रपतींचा जयजयकार केला. पुतळा हटवण्याचा फतवा काढणारे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचा निषेध करण्यात आला. शिवप्रेमींची माफी मागा, तसेच पुतळा हटवण्याचा आदेश रद्द करावा, अशी मागणी शिवप्रेमींनी यावेळी केली.

हेही वाचा 

Back to top button