गोवा : गोमंतकीयांच्या जखमेवर मुख्यमंत्र्यांनी मीठ चोळले | पुढारी

गोवा : गोमंतकीयांच्या जखमेवर मुख्यमंत्र्यांनी मीठ चोळले

मडगाव : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात संकल्प यात्रेत सहभागी गोव्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. कर्नाटकातील कार्यक्रमात कर्नाटकाच्या नेत्यांनी म्हादई वरून भाषणे ठोकली. मात्र, डॉ. सावंत यांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही. मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा आरोप सेव्ह गोवा सेव्ह म्हादई फ्रंटच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.

गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक याच्यासह आपच्या प्रतिमा कुतिन्हो व अन्य उपस्थित होते. प्रशांत नाईक म्हणाले, म्हादईचे पाणी वळवण्याची कृती पूर्वनियोजित अजून भाजपश्रेष्ठींमुळे ही कृती सत्यात उतरली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात गेल्याबद्दल गोमंतकीय जनतेची माफी मागावी. यापुढे कर्नाटकात प्रचारासाठी जाणाऱ्या प्रत्येक नेत्याला उत्तर दिले जाईल. कर्नाटकाचे लाड सेव्ह गोवा सेव्ह म्हादई मंच खपवून घेणार नाही. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

कर्नाटकाच्या निवडणुकीत भाजपाचे स्टार प्रचारक बनून मुख्यमंत्री सावंत यांनी समस्त गोमंतकियांचा अपमान केला आहे असा आरोप कुतिन्हो यांनी केला. डॉ. सावंत यांच्या मनात राज्यातील जनतेबद्दल आपुलकी असती तर ते कर्नाटकाच्या व्यासपीठावर चढलेच नसते. जनतेपेक्षा मुख्यमंत्री पदाची खुर्ची जास्त महत्त्वाची आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. गोव्यातील वनसंपत्ती आगीत जाळून जात असताना मुख्यमंत्र्यांना त्याचे काहीच पडून गेलेले नाही. त्यांच्या शासकीय बंगल्याबाहेर पोलिस फौज ठेवण्याची वेळ आली असल्याचे त्या म्हणाल्या

Back to top button